मुंबई - राज्यातील समतोल विकासासाठी मागास भागात उद्योग उभे करण्याचे धोरण सरकारने अंगिकारले आहे. तसे असले तरी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात विभागीय असमतोल असल्याचे आर्थिक पाहणीत दिसून येत आहे.सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१७ दरम्यान राज्यातील सात विागात ३ लाख ५८ हजार ८३७ उपक्रमांची नोंद झाली. यापैकी सर्वाधिक १ लाख ०४ हजार ६५८ उपक्रम हे नागपूर विभागातील आहेत. यामध्ये पुणे विभाग ६९,७०२ या संख्येसह दुसºया स्थानी आहे. मात्र या उपक्रमांमधील रोजगाराचा विचार केल्यास नागपूरचा क्रमांक चौथा आहे. रोजगार श्रेणीत ७.२३ लाखांसह पुणे अव्वल आहे. त्या पाठोपाठ कोकण ६.३७, मुंबई ४.७५ व त्यानंतर नागपूर विभागातील रोजगाराच आकडा फक्त २.९३ लाख राहिला आहे.या उपक्रमांमधील गुंतवणुकीचा विचार केल्यास त्यातही पुन्हा पुणेच अव्वल आहे. पुणे विभागातील एमएसएमर्इंमधील गुंतवणूक २५,३९९ कोटी रुपये राहिली. दुस-या स्थानावर कोकण विभागातील (मुंबई वगळून) गुंतवणूक २०,२२० कोटी रुपये इतकी राहिली आहे. सर्वाधिक एमएसएमई असलेल्या नागपूर विभागातील गुंतवणुकीचा आकडा फक्त ८,१३३ कोटी रुपये आहे.
छोट्या उद्योगांत विभागीय असमतोल, प्रकल्प नोंदणीत नागपूर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 3:57 AM