शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

माऊलींच्या जयघोषात पंढरीकडे प्रस्थान

By admin | Published: July 02, 2016 2:23 AM

संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या शुक्रवारी (दि. १) पहाटेच नाना पेठ आणि भवानी पेठेतून हडपसरकडे मार्गस्थ झाल्या

हडपसर : संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या शुक्रवारी (दि. १) पहाटेच नाना पेठ आणि भवानी पेठेतून हडपसरकडे मार्गस्थ झाल्या. झाकोळलेल्या आभाळातून सोनेरी किरणांमध्ये वारकरी बांधव न्हावून निघाला. उन पावसाच्या खेळ सुरूच झाला नाही, त्यामुळे वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नव्हते. माऊली माऊली करीत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी ९ वाजता हडपसर गाडीतळावर दाखल झाली. त्यानंतर अकराच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली.हडपसर गाडीतळावर महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी महापौर वैशाली बनकर, विजय वाडकर, विजया कापरे, रंजना पवार, विजय देशमुख, सुनील बनकर, प्रवीण तुपे, अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस आयुक्त कल्पना बारवकर, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या विसाव्या ठिकाण बदलल्याने भाविकांची उत्तम सोय झाली होती. पुरुष आणि महिलांची स्वतंत्र रांग तयार केली होती, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावर्षी ज्येष्ठ आणि महिलांनी समाधानाने दर्शन घेता आल्याचे सांगितले.पुरुष मंडळी दिंडी पताका खांद्यावर घेऊन, तर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पांडुरंगाचे नामस्मरण करीत होते. कुठे भजन, तर कुठे कीर्तन ऐकण्यात भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते. हडपसर आणि परिसरातील बारा वाड्यामधील नागरिक माऊलींच्या दर्शनासाठी हडपसरमद्ये दाखल होतात. सोलापूर रस्त्यावर रेसकोर्स ते लोणी काळभोर आणि हडपसर गाडीतळ ते सासवडपर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती.लाडू, चिवडा, गोडीशेव, महिलांसाठी नकली दागिने अशा विक्रेत्यांनीही पालखी सोहळ््यात गर्दी केली होती. त्याचबरोबर वेगवेगळ््या आकाराच्या पिपाण्या, तलवार आणि ढाल असे साहित्यही विक्रीसाठी होते. अनेकांनी छोट्यांसाठी त्याची खरेदी केली. छोट्यांनी पिपाण्या वाजवून परिसर दुमदुमून टाकला होता. विठू माऊलींच्या भेटीला निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद््गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शनाने भाविक समाधानी होत होते. काहींनी सासवड, तर काहींनी लोणीपर्यंत पालखीमध्ये सहभागी होण्याचा आनंद लुटला. (वार्ताहर)>वारकरी जखमीपांडुरंगाच्या भक्ताची सेवा करण्यासाठी पुणे शहर आणि उपनगरांतील नागरिकांचा प्रचंड उत्साह होता. आज एकादशीनिमित्त केळी, खिचडी, गरमगरम वाफाळता चहा देण्यात अनेकांनी धन्यता मानली. मात्र, वारकरी भक्तांनी केळी खाल्ल्यानंतर साली रस्त्यातच टाकल्या. त्यामुळे अनेक वारकरी घसरून पडले आणि काहींना मोठी दुखापतही झाली, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दरवर्षीच्या तुलनेत वारकऱ्यांची संख्या वाढली होती; मात्र फराळवाटप करणाऱ्या संस्था आणि संघटनांची संख्याही घटली होती.