शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

कारागृहातून पळालेल्या कैद्याची कारागृहात रवानगी

By admin | Published: September 23, 2014 1:04 AM

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी महिलाविषयक कायद्याच्या विशेष न्यायाधीश कु. एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने कारागृहातून पलायन केलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला न्यायालयीन कोठडी सुनावून

आता धंतोली पोलीस ताब्यात घेणारनागपूर : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी महिलाविषयक कायद्याच्या विशेष न्यायाधीश कु. एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने कारागृहातून पलायन केलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली. दरम्यान कारागृहातील पलायनप्रकरणी धंतोली पोलिसांनी या कैद्याचा न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केला. या वॉरंटवर त्याला कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली जाणार आहे. सूरज श्याम अरखेल (३७) असे या कैद्याचे नाव असून, तो वर्धेच्या इतवारी बाजारनजीकच्या फुलफैल वस्तीतील स्वीपर कॉलनी येथील रहिवासी आहे. सूरजने १७ सप्टेंबर रोजी कारागृहातून पलायन केले होते. त्यामुळे कारागृह रक्षक सदानंद ठोकळे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी या कैद्याविरुद्ध भादंविच्या २२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. १९ एप्रिल २००० पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याची खुल्या कारागृहासाठी निवड झाली होती. त्याचा गैरफायदा घेऊन शेतीच्या कामावर असतानाच त्याने पलायन केले होते. पलायनाच्या दिवशीच सूरजने मोहननगर खलासी लाईन येथील १७ वर्षे १० महिने वय असलेल्या पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. सदर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने त्याला १९ सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर येथे अटक करून अपहृत मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली होती. त्याचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला होता. पोलीस कोठडीची मुदत संपताच त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करून त्याच्या न्यायालयीन कोठडीची विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने सूरज अरखेल याला न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. लुबेश मेश्राम आणि अ‍ॅड. अमित बंड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)अरखेलने दिली होती खुनाची धमकीजन्मठेपेचा कैदी सूरज अरखेल याने पीडित अपहृत मुलीच्या कुटुंबाला खुनाची धमकी दिली होती, अशी माहिती प्रथम खबरी अहवालात नमूद आहे. पीडित मुलगी ही बी.ए. प्रथम वर्षाला शिकत आहे. ती आपल्या कुटुंबासह गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असताना तिच्या भावाला पोलिसांनी ८ फेब्रुवारी २०१४ रोजी भादंविच्या ३९४ कलमांतर्गत अटक केली होती. त्यानंतर १३ फेब्रुवारीपासून तो कारागृहात होता. त्याला सूरजने कारागृहातून कुटुंबाशी बोलण्यासाठी मोबाईल सेवा उपलब्ध करून दिली होती. पीडित मुलीचा भाऊ मार्चमध्ये सुटल्यानंतर सूरज हा या कुटुंबाशी मोबाईलवर सतत संपर्क साधत होता. पीडित मुलीशी तो वारंवार मोबाईलवर बोलायचा. कुटुंबाने त्याला मनाई केली असता त्याने ‘तुमच्या मुलीशी प्रेम करतो, लग्न करणार आहे’, असे सांगून टाकले होते. त्याला फोन करण्यास मनाई करण्यात आली असता त्याने खुनाची धमकी दिली होती.