गौरीशंकर घाळे, मुंबईविधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नसल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़ किमान मते न मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे. आघाडीच्या माध्यमातून राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राष्ट्रवादीच्या १४८ तर काँग्रेस १४२, शिवसेना ११६ आणि भाजपाच्या ४५ उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे़. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था यात सर्वांत बिकट आहे. या पक्षाच्या तब्बल २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे़ तसेच या निवडणुकीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे दिसून आले़ निवडणुकीच्या रिंगणातील १७९८ पैकी १६८३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, तर अवघे ७ अपक्ष उमेदवार विजयी झाले. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची मतदारांनी दारुण स्थिती करून टाकली.
३७३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!
By admin | Published: October 24, 2014 4:26 AM