उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह, उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 11:33 AM2020-10-26T11:33:52+5:302020-10-26T11:42:54+5:30

थकवा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले होते. 

Deputy Chief Minister Ajit Pawar corona positive admitted to Breach Candy Hospital for treatment | उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह, उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह, उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Next

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थकवा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले होते. 

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन," असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्राऊंड लेव्हलला काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अगदी कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते ग्राऊंड लेव्हलला काम करत होते. त्यांनी नुकताच अतिवृष्टीचा फटका बसलेल्या काही भागांचीही पाहणी केली. त्यांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. मात्र, बुधवारी त्यांनी दौरे रद्द केले होते. यादरम्यान ते करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजीही घेत होते. खबरदारी म्हणून त्यांनी करोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र, डॉक्टरांनी सांगितल्यामुळे ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आले नाही. सुप्रिया सुळे यांनी त्यांचा आणि खडसे यांचा फोनवरून संवाद साधून दिला होता. 'देवगिरी' निवासस्थानातूनच ते दैनंदिन शासकीय कामे करत होते.

अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारने या वृत्ताचे खंडन केले आहे. त्याने अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

Read in English

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar corona positive admitted to Breach Candy Hospital for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.