अजित पवारांचा जितेंद्र आव्हाड, जयंत पाटलांना टोला; "मी बरेच वर्ष विधिमंडळात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 05:28 PM2023-07-03T17:28:07+5:302023-07-03T17:28:42+5:30

देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. त्यालाही पाठिंबा देत केंद्राचा फायदा राज्याच्या विकासासाठी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं अजित पवार म्हणाले.

Deputy Chief Minister Ajit Pawar criticizes Jitendra Awad, Jayant Patil | अजित पवारांचा जितेंद्र आव्हाड, जयंत पाटलांना टोला; "मी बरेच वर्ष विधिमंडळात..."

अजित पवारांचा जितेंद्र आव्हाड, जयंत पाटलांना टोला; "मी बरेच वर्ष विधिमंडळात..."

googlenewsNext

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर बंडखोर राष्ट्रवादी आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेतला. रात्री उशिरा आव्हाडांनी अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. मात्र या पत्राला काही अर्थ नाही. आम्ही घेतलेली भूमिका पक्षाच्या हितासाठी आहे असं सांगत अजित पवारांनीजयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला.

अजित पवार म्हणाले की, काल बातमीत पाहिले, एकाला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून नेमले गेले. मी बरेच वर्ष विधिमंडळात काम केले. विरोधी पक्षनेता नेमण्याचे काम विधानसभा अध्यक्ष करतात. विरोधात सगळ्यात जास्त संख्या ज्यांची असते त्यांचा विरोधी पक्षनेता घोषित केला जातो. आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी यासाठी काही विधाने केली जातात त्याला अर्थ नाही. बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्यासोबत आहेत. संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत राहणार असं सांगत अजितदादांनी नाव न घेता आव्हाडांवर निशाणा साधला.

तसेच देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. त्यालाही पाठिंबा देत केंद्राचा फायदा राज्याच्या विकासासाठी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या विचारांचे असले तरी विकासकामांच्या बाबतीत कमतरता राहते. हे अनेक वर्ष बघत आलोय. काल काहींनी पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असल्याने आम्ही जे करतोय पक्षाचे हिताचे करतोय. नोटीस काढण्याचा अधिकार त्यांना नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे. आमच्यासोबतचे आमदार भवितव्य व्यवस्थित कसे राहील. कुठल्याही घटनेची कायद्याची अडचण येणार नाही याची खबरदारी आम्ही घेतोय असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल म्हणाले की, २१ जून २०२३ रोजी माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्त केले. मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन पार पाडले. तेव्हा पक्षाच्या कार्यकारणीत माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. हे पद आधी नव्हते. या अधिकाराअंतर्गत ज्या संघटनात्मक निवडी माझ्या स्वाक्षरीने जाहीर केली होती. त्या अनुंषगाने महाराष्ट्रात जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या. परंतु व्यवस्था म्हणून जयंत पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. आता जयंत पाटलांना अधिकृतपणे जबाबदारीतून मुक्त केल्याचे कळवले आहे. त्यांच्याऐवजी सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहेत. तातडीने सुनील तटकरेंनी पदभार स्वीकारून कामाला लागावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटलांनी त्यांचा पदभार सुनील तटकरेंच्या ताब्यात द्यावा असं सांगितले आहे.

त्याचसोबत केंद्रीय स्तरावर काही पत्रे, अपात्रेबाबत पत्रे वाचली. कुठल्याही व्यक्तीच्या अपात्रेची प्रक्रिया ही पक्षाद्वारे होत नाही. कुणावरची अपात्रतेची कारवाई तातडीने होत नाही. पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे मी सूचित करतो. अजित पवार यांची आमदारांनी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून नियुक्त केले आहे. पक्षाच्या वतीने ते जबाबदारी सांभाळतील. पक्षाचा प्रतोद कोण हे पक्ष ठरवतो. त्यानुसार अनिल पाटील हे प्रतोद कायम राहतील हे पक्ष म्हणून मी विधानसभा अध्यक्षांना कळवले आहे. ज्या सूचना, पत्रे द्यायची आहेत ती आम्ही दिली आहेत असंही पटेल म्हणाले.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar criticizes Jitendra Awad, Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.