Eknath Shinde Latest News: 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे विधान महाराष्ट्रात यापूर्वीही प्रचंड गाजलं. पंकजा मुंडेंच्या संबंधाने केले गेलेले हे विधान आता शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदेंच्या संदर्भात केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा झाली. या सभेत बोलताना खासदार माने म्हणाले की, 'शासनाच्या रेकॉर्डवर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असले, तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत.'
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जाहीर आभार सभेत बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव केला.
वाचा >>स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा...; शिंदेंनी सभेत दिले संकेत
खासदार धैर्यशील माने म्हणाले, "साहेब (एकनाथ शिंदे) रेकॉर्डवर तुम्ही उपमुख्यमंत्री असं शासन म्हणत असेल. पण, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असेल, तर तो एकनाथ संभाजी शिंदे! हाच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे."
मानेंनी केलं शिंदेंच्या नेतृत्वाचं कौतुक
"मला मुद्दामहून सांगितलं पाहिजे की, एकनाथ कोण पासून सुरू झालेला प्रवास जगाच्या गुगलने रेकॉर्ड होतं, एकनाथ शिंदे कोण आहेत, हुडकत (शोधत) होते. आज तळागाळातील माणसाला जाऊन विचारलं आणि साहेबांची (एकनाथ शिंदे) गाडी थांबवली, तर बारकं शेंबड पोरग सुद्धा येतंय आणि शिंदे साहेब आले म्हणतंय. ही ओळख दोन-अडीच वर्षात शिंदे साहेबांनी नवतरूणांच्या ह्रदयावर कोरून ठेवली."
'आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे'
"तुम्ही आभार मानायला आलात, पण खरं म्हणजे आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत. आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. आम्ही मागत होतो कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रिपद द्यावं. आपण प्रकाशरावांच्या रुपाने मंत्रिपद तर दिलंच, पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रिपद मिळालं आणि पालकमंत्रिपदही मिळालं. ही पहिलीच वेळ आहे. या तालुक्याला कधीही न्याय मिळाला नव्हता", असे खासदार धैर्यशील माने यावेळी म्हणाले.