शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'त्या' बातमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा; "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 3:26 PM

राज्यावरील ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्यानं विरोध केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांवरून महायुतीत वाद असल्याचं समोर आलं, मात्र आता अजित पवारांनी स्वत: या सर्व वादावर खुलासा केला आहे.  

मुंबई - राज्य सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाने विरोध केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या. आता या बातमीवरून उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात खुलासा करत प्रसारमाध्यमांना सल्ला दिला आहे.

'एक्स' वर ट्वीट करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना राज्याच्या वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे असं त्यांनी म्हटलं.

 

तसेच राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत असा आरोप अजित पवारांनी माध्यमांना सल्ला दिला. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या अशासकीय सदस्यांच्या तालुका आणि वॉर्डस्तरीय समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अधिकार देण्यात आले आहेत. तालुका आणि वॉर्डस्तरीय समिती प्राप्त अर्जांची छाननी करून ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. त्यानंतर ती यादी विधानसभा मतदारसंघनिहाय समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या समितीत असलेल्या दोन अशासकीय सदस्य आणि अध्यक्ष निवडीचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत तर शासकीय सदस्य नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अशासकीय सदस्य या समितीचा अध्यक्ष असेल, त्यामुळे सत्ताधारी पक्षांना आपल्या सोयीच्या सदस्याला अध्यक्षपद देणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र