कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 101 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे.
Coronavirus: राज्यात संचारबंदी लागू, कोणकोणते होणार बदल; काय सुरु राहणार, काय बंद?
कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. परंतु संचारबंदीच्या निर्णयानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
coronavirus : संचारबंदी मोडली, राज्यातील विविध भागात भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी दूध, औषधं, भाजीपाला, दवाखाने, किराणासारख्या जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र तरी देखील नागरिक भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहे. त्यामुळे भाजी घेण्यासाठी गर्दी करू नका, अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल,' असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. तसेच संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. ह्यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही.आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, घरीच रहा अशी विनंती देखील अजित पवार यांनी नागरिकांना केली आहे.
कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 89 वर पोहोचली होती. ता त्यात सोमवारी आणखी 8 जणांची भर पडली. या आठ जणांमध्ये सांगलीच्या 4, मुंबईच्या 3 आणि साताऱ्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 101 वर पोहोचली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसचे साडे तीन लाख रुग्ण आढळून आले आहेत. करोनापासून जीव वाचवण्यासाठी 50 देशांमधील सरकारांनी सुमारे 100 कोटीपेंक्षा जास्त लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादु्र्भाव रोखण्यासाठी जगातील ३५ देशांनी लॉकडाउनची घोषणाही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अनेक देशांनी तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद केली असून देशांतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे. संपर्क आणि संसर्गामुळे करोना होत असल्याने तो रोखण्यासाठी जगभरातील सर्व देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.