"गिरीश महाजनांचं रडणं तर अजून बंदच होईना…"; सभागृहात अजित पवारांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 02:01 PM2022-07-03T14:01:35+5:302022-07-03T14:01:43+5:30

अजित पवारांनी सभागृहात घेतली फिरकी.

deputy cm ajit pawar on bjp girish mahajan maharashtra vidhan sabha politics devendra fadnavis deepak kesarkar | "गिरीश महाजनांचं रडणं तर अजून बंदच होईना…"; सभागृहात अजित पवारांची तुफान फटकेबाजी

"गिरीश महाजनांचं रडणं तर अजून बंदच होईना…"; सभागृहात अजित पवारांची तुफान फटकेबाजी

googlenewsNext

रविवारी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला.

“फडणवीस जेव्हा टीव्हीवर बोलत होते, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता एकनाथ शिंदे घेतील असं सांगितलं तेव्हा एकदम पिनड्रॉप सायलेन्सच झाला. कितीतरी भाजपचे लोक तर रडायलाच लागले. कोणाला काही कळेना. सगळ्या महाराष्ट्राला तो शॉक होता. गिरीश महाजनांचं रडणं तर अजून बंदच होईना. ते फेटा बांधायला दिला तर ते फेटा सोडतात आणि डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी वापरतात. खऱ्या अर्थानं त्यांना वाईट वाटलंय, पण आता काय करता?,” असं अजित पवार म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

केसरकरांचाही उल्लेख
पहिली लाईन पाहिली तरी तुम्हाला कल्पना येईल. गणेश नाईक, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर. दीपक केसरकर तर आता काय चांगले प्रवक्ते झालेत. त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलं नाही, असं म्हणत त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

Web Title: deputy cm ajit pawar on bjp girish mahajan maharashtra vidhan sabha politics devendra fadnavis deepak kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.