शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

ज्यांनी बाहेर राहून अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो, फडणवीसांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:55 AM

deputy cm Devendra Fadnavis thanks floor test eknath shinde bjp maharashtra government congress leaders absent for voting ashok chavan : विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानादरम्यान विरोधकांतील काही जण अनुपस्थित होते.

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. बहुमत चाचणीदरम्यान ज्यांनी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो असं म्हणत सभागृहात तुफान फटकेबाजी केली.“ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मतांनी पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली. त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो,” असं म्हणत फडणवीसांनी सभागृहात टोलेबाजी गेली. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले, कर्मावर अढळ निष्ठा असलेले असं व्यक्तीमत्व म्हणजे एकनाथ शिंदे. ते एक कुशल संघटक आहेत, पण ते जनतेचे सेवकही आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या प्रभावामुळे १९८० च्या दशकात त्यांनी शिवसेनेत सक्रिय काम सुरू केलं. एखादा साधा कार्यकर्ता, शाखाप्रमुख असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी सांभाळली. आनंद दीघेंनी १९८४ मध्ये आनंद दीघे यांनी शिंदेंची शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सामान्य माणसाला न्याय देण्याकरत ते आंदोलन करायचे, असंही त्यांनी अभिनंदनपर प्रस्तावात म्हटलं.

जितकं शिंदे सरकारसाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता तितकाच तो विरोधी पक्षांसाठी महत्त्वाचा होता. कारण आपल्याकडे बहुमत नसलं तरी प्रत्येक मताची किंमत अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे अशा महत्वाच्या क्षणी वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं ठरतं. पण आज काँग्रेसच्या लेटलतीफ आमदारांमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे पाच आमदार आज बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्यानं त्यांना मतदानाला मुकावं लागलं. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचाही समावेश होता. 

काँग्रेसचे पाच आमदार अनुपस्थितविधानसभा अध्यक्षांनी बहुमत ठराव मांडला आणि यावेळी आमदारांची शिरगणती करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. यावेळी शिरगणती सुरू होण्याआधी दोन वॉर्निंग बेल दिल्या जातात. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे आतून बंद करण्यात येतात. पण काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाचे दारबंद झाल्यानंतर विधानभवनात पोहोचले. त्यामुळे या आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप देखील उशीरा पोहोचले. त्यामुळे त्यांनाही मतदान करता आलेलं नाही. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाEknath Shindeएकनाथ शिंदे