सदानंद नाईक
उल्हासनगर : डॉ राजा दयानिधी महापालिकेचे निष्क्रिय आयुक्त असल्याचा आरोप करून उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपोषण केले. मात्र उपोषणानंतर आयुक्ताचा स्वभाव व महापालिकेचा भोंगळ कारभार थांबणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी करून पालिका आयुक्तांच्या कारभारावर टीका केली.
उल्हासनगरात गेल्या वर्षी कोरोना रुग्णाची संख्या वाढली. त्या दरम्यान डॉ राजा दयानिधी यांची महापालिका आयुक्त पदी नियुक्ती झाली. दयानिधी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी कोरोना महामारी वेळी चांगले काम करून शहरवासीयांची सुरवातीला वाहवाह मिळविली. मात्र त्यानंतर नगरसेवक, नागरिक, पत्रकार यांच्यासह पालिका अधिकारी यांना आयुक्त भेटत नसल्याचा आरोप होऊन त्यांच्या बाबत शहरात रोष निर्माण झाला. पत्रकारांनीही आयुक्त भेटत नसल्याचे सांगून त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. एकूणच आयुक्त दयानिधी भेटत नसल्याने त्यांच्याबाबत शहरात असंतोष निर्माण झाला. अखेर उपमहापौर भगवान भालेराव त्यांच्या उपोषणांने, आयुकविरोधीचा राग बाहेर पडला.
शहरात अनधिकृत व धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असतांना दुसरीकडे शेकडो विना परवाना बहुमजली अवैध बांधकामे आरक्षित जागा, खुल्या जागेवर उभे राहत आहेत. अश्या बांधकामावर गेल्या दीड वर्षात महापालिकेने पाडकाम कारवाई केली नाही. मग अश्या भूमाफियावर अभय कोणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारीत आहेत. महापालिकेच्या अनेक विभागाचें आर्थिक बजेट दोन महिन्यात संपल्याची टीका होत आहे. आमदानी अठ्ठनी, खर्चा रुपया. अशी टीका होतआहे. पाणी पुरवठा व बांधकाम विभागातील १०० कोटीच्या कामाचे प्रस्तावाचा पाऊस पडला. रस्ते खड्ड्यात गेल्याने नागरिक हैराण आहेत, उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम जोडणारा एकमेव संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवर पूल व पूर्वेतील कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नाल्यावरील पूल केव्हाही पडण्याच्या मार्गावर आहे.
महापालिकेच्या भोंगळ कारभारावर टीका
महापालिका कोविड रुग्णालयासाठी साहित्य खरेदीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने मंजुरीसाठी आला. साहित्या मधील प्रत्येक वस्तूची किंमत बाजारभाव पेक्षा दामदुप्पट असल्याने सर्वस्तरातून टीका झाली. एका उशीची किंमत ९००, लोखंडी बेडची किंमत १९ हजार ५०० तर एका फ्रीजची किंमत साडे तीन लाख दाखविण्यात आले. इतर वस्तूच्या किंमतीही अश्याच दामदुप्पट असल्याची टीका उपमहापौर यांनी केली. यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला.