शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

राणेंच्या बुडीत बँकेत मतांची ठेव नको, देवेंद्र फडणवीसांचे सिंधुदुर्गवासीयांना आवाहन

By admin | Published: February 15, 2017 6:27 PM

लोकशाही निवड प्रक्रियेत पाच वर्षांकरीता मतदार आपल्या आशा, आकांक्षा ठेवून मतदान करतो. मात्र, मतदारांनी मतांची ठेव चांगल्या बँकेत

 ऑनलाइन लोकमतकुडाळ, दि. 15 - लोकशाही निवड प्रक्रियेत पाच वर्षांकरीता मतदार आपल्या आशा, आकांक्षा ठेवून मतदान करतो. मात्र, मतदारांनी मतांची ठेव चांगल्या बँकेत ठेवली पाहिजे. नारायण राणेंची बँक दिवाळखोरीत आली आहे, त्यामुळे ती बुडीत आहे. तेथे मत ठेवले तर लुटले जाईल. आपले मत भाजपाच्या बँकेत ठेवले तर पाच वर्षात पाचपट विकास रुपाने आम्ही ते परत करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुडाळ येथे बोलताना दिले. तसेच सी-वर्ल्ड प्रकल्प, चिपी विमानतळ, मुंबई-गोवा महामार्ग, ६५0 कोटी रूपयांचा सिंधुदुर्ग किल्ला आराखडा, रेल्वेने पश्चिम महाराष्ट्राशी जोडून वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. यातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित केला जाईल. यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही सिंधुदुर्गवासीयांना दिली.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ भाजपाची जाहीर प्रचारसभा कुडाळ येथील एस. टी. आगाराच्या मैदानावर बुधवारी झाली. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर, काका कुडाळकर, अतुल काळसेकर, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे काँग्रेसचे राहुल गांधी, नारायण राणे यांची दिवाळखोरीत चाललेली बँक आहे. या बँकेत मतरुपी ठेव ठेवलात तर ती लुटली जाईल. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी, सुरेश प्रभुंसारखी भाजपाची बँक आहे. या बँकेत मतरुपी ठेव ठेवल्यास तुम्हाला पाच वर्षात विकासाच्या रुपाने ती दुप्पट मिळेल.देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७0 वर्षे होत आलीत. देशासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही तेच प्रश्न आहेत. देशात आणि राज्यात गेली वर्षानुवर्षे त्यांनी शासन चालविले म्हणून अशी अवस्था झाली आहे. यात शासनकर्ते मोठे झाले. ५0 वर्षात त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा विकास झाला. आपण आहे तेथेच राहिलो. शासनकर्त्यांनी काम करत असताना मुलभूत सोयी-सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)  प्रकल्पांची नुसती भूमीपूजनेनारायण राणे यांनी पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम केले. मात्र, सिंधुदुर्गात एकही प्रकल्प ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या हातून प्रकल्प पूर्ण होणार नव्हते. नियतीला ते मान्यही नव्हते. आता आमच्या सरकारला दोन वर्षेच झाली. आम्ही प्रकल्पाची कामे सुरू केली आहेत. येत्या काही वर्षात ती पूर्णदेखील होतील. सी-वर्ल्डसाठी एक इंचही जागा घेतली नव्हतीसी-वर्ल्ड प्रकल्प आपणच आणला असे नारायण राणे सांगतात. राणे यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत सी-वर्ल्डसाठी त्यावेळी शासनाने एक इंचही जागा खरेदी केली नव्हती. मात्र, आम्ही सरकारमध्ये आल्या आल्या सी-वर्ल्डसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची मोजणी पूर्ण केली.  शिवसेनेबाबत चकार शब्द नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुडाळमधील जाहीर प्रचार सभेतील संपूर्ण भाषणात शिवसेनेबाबत एक चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे सिंधुदुर्गात काही ठिकाणी शिवसेनेशी भाजपाच्या झालेल्या छुप्या युतीला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा होता की काय ? असा प्रश्न उपस्थित होत होता. शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदलकाँग्रेसच्या काळात महाराष्ट्र राज्य शैक्षणिकदृष्ट्या देशात अठराव्या क्रमांकावर होते. गेल्या दोन वर्षात प्रगत शैक्षणिक उपक्रम शासनातर्फे राबविले जात आहेत. यात राज्यभरातील १७ हजार शाळा डिजिटल करण्यात आल्या. त्यामुळे सध्या महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. गेल्या वर्षभरात ५ हजार मुलांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. येत्या दोन वर्षात प्रत्येक गावापर्यंत इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. महानेट कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींना फायबर केबलद्वारे जोडण्यात येणार आहे. प्रत्येक गावात कनेक्टीव्हीटी देण्यात येणार आहे.  तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती का?सन २0१८ पर्यंत सर्व जिल्हे स्मार्ट होतील. सिंधुदुर्ग स्वच्छ जिल्हा झाला. साक्षर जिल्हा झाला. आता हा जिल्हा डिजिटल होईल. देश बदलतो आहे, राज्य बदलते आहे. तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती का ?   जिल्हा परिषदेत स्वच्छता घडवासिंधुदुर्ग स्वच्छ व सुंदर जिल्हा बनविला. त्यामुळे आपण देशात प्रथम आलो. पारदर्शक प्रशासन द्या. केंद्र व राज्य सरकारच्या विचारांचे सरकार जिल्हा परिषदेवर आणा, असे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गवासीयांना केले. तसेच आम्ही आधी करतो आणि नंतर बोलून दाखवतो, असा टोला प्रभू यांनी यावेळी शिवसेनेला लगावला.मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे-  २०१७ च्या मध्याला चिपी विमानतळ प्रकल्प पूर्ण करणार. सी-वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करणार.-  सन २०१८ पर्यंत राज्यातील सर्व जिल्हे स्मार्ट होतील.- सिंधुदुर्ग स्मार्ट जिल्हा, साक्षर जिल्हा आणि आता डिजिटल जिल्हा होईल.-  रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊ.-  महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू.- २१९ कोटींचा आराखडा तयार केला असून त्यातून नद्यांचा कायापालट केला जाईल. -  आंबा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न केले जातील.-  मुंबई-गोवा महामार्गासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.-  कोकणातून पश्चिम महाराष्ट्र, बेळगाव, कर्नाटक येथे रेल्वेचे जाळे तयार करण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्हा सर्व कनेक्टीव्हीटीने जोडणार.-  रेल्वेकडून २ वर्षात ७५ हजार कोटी रूपयांची कामे सुरू.