मुंबई : राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्याकरिता तूरडाळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी अन्न व नागरीपुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.देशमुख म्हणाले, ‘आघाडी सरकारच्या कार्यकाळात तूरडाळ ९० रुपये प्रती किलोप्रमाणे महागली असताना, केंद्र सरकार व इतर राज्यांकडून तूरडाळ आयात करून आम्ही १ लक्ष मेट्रीक टन तूरडाळ उपलब्ध केली होती. ९० रुपये किलो तूरडाळीचे भाव असताना, आम्ही जनतेसाठी ती ५५ रुपये प्रतिकिलो दराने अंत्योदय, बीपीएल व एपीएल लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत, भाजपा सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत आले, परंतु एक वर्ष झाले, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर हे सरकार नियंत्रण आणू शकलेले नाही,’ अशी टीका देशमुख यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
सवलतीच्या दरात तूरडाळ द्या - देशमुख
By admin | Published: October 10, 2015 1:50 AM