'ओला व कोरडा दुष्काळ असतानाही राज्यातील शेतकरी मात्र मदतीपासून वंचित', नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:54 PM2023-11-09T19:54:28+5:302023-11-09T19:55:42+5:30

Nana Patole criticize Maharashtra Government: राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकारला शेतकऱ्यांची व्यथा व दुःख दिसत नाहीत म्हणून गेंड्याच्या कातडीच्या बधिर भाजपा सरकार विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रोश मोर्चा काढून धिक्कार करण्यात आला असल्याचे,   काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

'Despite wet and dry drought, the farmers of the state are deprived of help', Nana Patole's criticism | 'ओला व कोरडा दुष्काळ असतानाही राज्यातील शेतकरी मात्र मदतीपासून वंचित', नाना पटोलेंची टीका

'ओला व कोरडा दुष्काळ असतानाही राज्यातील शेतकरी मात्र मदतीपासून वंचित', नाना पटोलेंची टीका

मुंबई -  भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सातत्याने सांगत आहोत त्याचा प्रत्यय आजही येत आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ पडलेला असताना भाजपा सरकारने फक्त सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचे मतदारसंघ असलेल्या ४० तालुक्यातच दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकारला शेतकऱ्यांची व्यथा व दुःख दिसत नाहीत म्हणून गेंड्याच्या कातडीच्या बधिर भाजपा सरकार विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रोश मोर्चा काढून धिक्कार करण्यात आला असल्याचे,   काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

शेतकरी विरोधी भाजपा सरकारचा तीव्र निषेध करत भंडाऱ्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याची माहिती देताना पटोले पुढे  म्हणाले की, भाजपा सरकारने अन्नदात्याला वाऱ्यावर सोडलेले आहे, आधी अवकाळी पाऊस व नंतरच्या दुष्काळाने शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, धानासह इतर शेतमालाची खरेदी केंद्रे अजून सुरु केलेली नाहीत. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, विजय गावित आणि बाबा आत्राम यांच्याबरोबर खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत मुंबईत एक बैठक झाली, खरेदी केंद्रे लवकर सुरु करणार असे या बैठकीत सांगण्यात आले पण अजून खरेदी केंद्रे सुरु केलेली नाहीत. मुठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी ही खरेदी केंद्रे सुरु केली जात नाहीत का? पंतप्रधान छत्तिसगड मध्ये धानाला ३१०० रुपये भाव देऊ असे जाहीरपणे सांगतात मग महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना ३१०० रुपये भाव का देत नाही? २४०० रुपयेच भाव का देता? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी भंडारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यातही आक्रोश मोर्चे काढण्यात आले आहेत.

भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश पदाधिकारी नाना गावंडे, माजी आमदार अनिल बावनकर, जि. प. अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, नंदाताई पराते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा जयश्री बोरकर, जि. प. सभापती मदन रामटेके, रमेश पारधी, स्वाती वाघाये, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मधूकर लिचडे तथा सर्व जि. प. सदस्य, लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याच्या विविध भागातून एकत्र आलेले कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

Web Title: 'Despite wet and dry drought, the farmers of the state are deprived of help', Nana Patole's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.