शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: राज्यात एक दिवसाचा दुखवटा; NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
2
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्चा देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
3
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
4
"मोदी महान आहेत, ते वडिलांसारखे दिसतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
5
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
6
Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट
7
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
8
"मी का त्याची आठवण काढेन", सलमान खानचं नाव ऐकताच असं का म्हणाली युलिया वंतूर?
9
Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर
10
"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट
11
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट
12
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
13
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
14
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
15
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
16
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
17
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
18
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
19
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
20
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर

उद्ध्वस्त शेत अन् हताश शेतकरी

By admin | Published: March 15, 2015 1:15 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरल्याने रब्बी हंगामातील सोंगणीलायक पिके अक्षरश: आडवी झाली

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरल्याने रब्बी हंगामातील सोंगणीलायक पिके अक्षरश: आडवी झाली असून डोळ््यांदेखत उद्धस्त झालेले शेत हताशपणे पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गारपीट थांबण्याचे नाव घेत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात वीज कोसळून सहा जनावरेही दगावली आहेत.पश्चिम विदर्भातही नुकसान पश्चिम विदर्भात गहू, हरभरा भाजीपाला, फळपिके असे जवळपास ७५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा पाऊस झाल्याने खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता गारपिटीने सतावले आहे. यवतमाळमध्ये १७,४४६, अमरावतीत ७ हजार, अकोल्यात १,८३० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. पण पाऊस सुरू च असल्याने नुकसानीचे आकडे बदलत असल्याचे अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगितले. नगरला बागा आडव्या अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात मागील आठ-दहा दिवसांत सहा तालुक्यातील शंभर गावांना पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा, कांदा या पिकांसह डाळींब, द्राक्ष आणि चिकूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू झाले असून पुढील आठवड्यात अहवाल हाती येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री वीज पडून पारनेर तालुक्यात पाच शेळ्या व तीन करडे ठार झाली. सांगलीत द्राक्षबागांवर संकट सांगली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने द्राक्षबागांसह रब्बी पिके आडवी झाली. खानापूर तालुक्यात गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना जबर फटका बसला. सध्या तालुक्यातील ३५ ते ४० टक्के द्राक्षे बाजारपेठेत आली आहेत. उर्वरित ६० टक्के द्राक्ष माल अजूनही शेतात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्पुणे : गेल्या १५ दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट पुढील दोन दिवसानंतर सरणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. १५, १६ मार्चला पावसाची शक्यता असून १७ मार्चपासून पाऊस गायब होईल आणि आकाश निरभ्र राहील, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.खान्देशात हजेरीच्नंदुरबारमधील तळोदा तालुक्यात गारा पडल्या. धुळे येथेही रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. खान्देशात आतापर्यंत दोन वेळा पंचनामे झाले आहे. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अजून झालेले नाहीत, तोच पुन्हा पाऊस कोसळत आहे.युरोपातील द्राक्षनिर्यात ५०० कोटींनी घटणारनाशिक : आॅक्टोेबरपासून अधूनमधून होत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात निम्म्याने घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी युरोपात ९७५ कोटींची द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा गारपिटीमुळे सुमारे ४५० कोटींच्या आसपास राहणार असल्याने त्यात ५०० कोटींची घट होईल, असे चित्र आहे. मागील वर्षी मुंबई पोर्ट ट्रस्टमधून १० हजार कंटेनरची द्राक्ष निर्यात होऊन त्यापोटी सुमारे १,६०० कोटींचे परकीय चलन मिळाले होते.पुढील १० ते १२ दिवसांत निर्यात २ हजार ५०० कंटेनरच्या घरात जाईल. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ३,५०० कंटेनर निर्यात कमी होईल, असे दिसते. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १५ मेट्रीक टन द्राक्ष असतात. - अशोक गायकवाड, अध्यक्ष,महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघनिर्यातक्षम द्राक्षांबाबत काही निकष आहेत. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेत व दर्जातही काही प्रमाणात फरक पडू शकतो. तसेच स्थानिक बाजारपेठेतही व्यापाऱ्यांकडून पडते भाव मिळू शकतात. - ज्ञानेश्वर बोराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी