शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

संतांविषयी सविस्तर अभ्यासक्रम हवा

By admin | Published: February 29, 2016 1:19 AM

महाराष्ट्रातील संत आणि राष्ट्रपुरुषांविषयी सविस्तर अभ्यासक्रम सीबीएससी आणि आयसीएससीत असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे सांगितले

व्यथा पाऊणगाववासीयांची : पुनर्वसनाची प्रतीक्षा, जगणे झाले कठीणनिश्चित मेश्राम पालोराउमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाऊणगाव हे गाव पवनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. एकीकडे मरू नदी व गोसे प्रकल्पाच्या ओव्हरफ्लो पाण्याने तुडूंब भरलेली आहे. तर दुसरीकडे गावाला जाण्याकरीता सहा कि़मी. घनदाट जंगलातून जावे लागते. रोजगाराचा शोधात येथील नागरिक जीव मुठीत घेवून प्रवास करीत आहे. या प्रश्नाकडे लक्ष देवून पाऊनगाव वासीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.पवनी तालुक्यात व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र ज्या प्रसंगी गावाचे पुनर्वसन करायचे होते त्या प्रसंगी या गावाला भिवापूर- नागपूर राज्यमार्गावर दाखविण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या चुकीच्या नियोजनामुळे हे गाव वगळण्यात आले. परिणामी या गावातील जनतेला जीव मुठीत घेवून रहावे लागत आहे. गावाचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून येथील जनतेनी अनेकदा संबंधित विभागाला निवेदन दिले. मात्र याकडे कुणीही दिले नाही. गावात कोणतेच रोजगार नसल्यामुळे जीवन कसे जगावे, शासनाच्या कोणत्याही योजना या गावापर्यंत पोहचत नाही. पाऊनगावची जवळपास १,२०० लोकसंख्येचे गाव आहे. मेंढपाळ हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहे. हा गाव उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पात येत असल्यामुळे येथे जनावरांना चराईला बंदी आहे. घनदाट जंगलात हे गाव वसले आहे. जनावरे चराईला बंदी असल्यामुळे गावात कोणतेच रोजगार उरले नाही. या भागात बऱ्याच प्रमाणात नदीकाठावर शेती आहे. मात्र वन्यप्राण्यामुळे पिकाची नासाडी केल्या जाते. पिक रक्षणाकरीता शेतात मचान बांधून पिकाचे रक्षण करावे लागते. वन्यप्राणी नासाडी करतात. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही मदत दिली जात नाही. गावात दररोज वन्यप्राणी येत असतात. वन्य प्राण्यामुळे गावात भुकायला कुत्रेसुद्धा राहिले नाही. वाघोबाचे तर दररोज दर्शन होतात. गावात रोजगार नसल्यामुळे येथील महिला तुटक्या फुटक्या डोंग्यावर बसून नदीतून प्रवास करतात. अनेकदा डोंगे पलटी मारतात वितभर पोटासाठी अनेकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. पवनी येथे जायचे असल्यास घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो.येथे आरोग्य, शिक्षण अशा कोणत्याच सुविधा नाहीत. सदर प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता येथील अनेक महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. वनमंत्री आज ना उद्या आमच्या गावाची पाहणी करण्याकरीता येतील हिच अपेक्षा करून आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी व वनमंत्र्यांनी भेट दिली नाही. सायंकाळी ५ वाजेपासूनच हा रस्ता वन्यप्राण्याच्या भितीने बंद होते. गावाच्या ५ कि़मी. वन विभागाची चौकी आहे. समोर पाऊनगाव असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबविले जात नाही, अशा प्रसंगी वन्य प्राण्याची शिकार करणारी टोळी जावू शकते. याकडे वनविभागासह जिल्हा प्रशासनाने लक्ष दिल्यास पाहुणगाववासीयांची समस्या मार्गी लागू शकते.