वाशिम : अहमदनगर जिलतील जवखेडा खालसा येथील दलित हत्याकांडातील संशयीत आरोपीला सोनखास येथून वाशिम पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.
पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथील दलित हत्याकांडाने राज्यात खळबळ उडाली होती़ या घटनेचा सर्व स्तरावरुन निषेध करण्यात आला होता़ त्यामुळे या गुनचा तपास लावणो पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होत़े पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली़ या प्रकरणात पोलीस तपास करताना सोनखसच्या आकाश गोरे याच्याकडे संशयाची वळली़ आकाश गोरे (21) वाशिमच्या सोनखास येथील रहिवासी असून, तो अहमदनगर जिलतील रांजणगाव येथे खासगी कंत्रटदाराकडे कामास होता. दिवाळीनिमित्त आकाश गोरे सोनखस येथे आला होता. वाशिम पोलिसांनी संशयित आकाशला ताब्यात घेतले असून, त्याची रवानगी अहमदनगरला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितल़े
जाधव कुटुंबीयांतील तिघांचे हत्याकांड 22 ऑक्टोबरला दुपारी उघडकीस आले. दलित चळवळीतील सर्वच नेत्यांनी जवखेडेकडे धाव घेतली. राजकीय नेते, कार्यकर्ते यांची गर्दी वाढल्याने तपास कामात पोलिसांना अडथळे येत आहेत. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यामध्ये तिघांचेही आधी गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच वेळी तिघांचे खून करण्यात आल्यामुळे प्रतिकार करण्यास कोणताही वेळ मिळाला नसल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
पोलीस चक्रावले
पोलीस दलातील विशेष पथके आरोपींच्या मागावर असून सर्व परिसराची कसून चौकशी करण्यात आली आहे. मुंबईत शिकत असलेल्या सुनील याच्या डेअरी सायन्स कॉलेजर्पयत पोलिसांनी तपासाचे धागे-दोरे तपासले आहेत. मात्र तेथेही काहीच सुगावा लागला नाही. आरोपींनी सोनई हत्याकांडाचा बारकाईने अभ्यास करून त्याचीच पुनरावृत्ती केल्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत.
डीआयजी तळ ठोकून
हत्याकांडाची घटना अत्यंत गंभीर असल्याने तपास जलदगतीने व्हावा, यासाठी नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके आठ दिवसांपासून नगर-पाथर्डीत तळ ठोकून आहेत.