शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले डिटेक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:09 AM

नवा ट्रेंड : अनैतिक संबंध, बदनामीकारक प्रसंगांची जमवाजमव, ‘हनी ट्रॅप’चेही आश्वासन

नवी दिल्ली : हल्ली निवडणुका हायटेक झाल्या आहेत. प्रचारातही अद्ययावत यंत्रणांचा वापर होऊ लागला आहे. अगदी त्याचप्रमाणे विरोधकांना ट्रॅक करण्यासाठी स्मार्ट पर्यायायाच वापर सुरू आहे. विरोधकांच्या गोटात काय चालले आहे हे तपासण्यापासून त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी विस्फोटक मुद्दे शोधण्याचे काम पक्षांनी खासगी डिटेक्टिव्ह एजन्सींना दिले आहे.

‘असोसिएशन आॅफ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अँड इन्वेस्टिगेटर्स’चे अध्यक्ष कुंवर विक्रम सिंह यांनी अशी माहिती दिली. दिल्लीतील उमेदवारांनीदेखील विरोधी उमेदवारावर पाळत ठेवण्यासाठी संपर्क केल्याचे ते म्हणाले. मात्र, व्यावसायिक गोपनीयतेचा हवाला देत, त्यांनी उमेदवारांची नावे सांगण्यास नकार दिला. सिंह म्हणाले की, राजकीय पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार आम्हाला कंत्राट देतात. विरोधकांच्या रणनीतीची माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी याशिवाय अनैतिक संबंधांची माहितीही त्यांना हवी असते. विस्फोटक माहिती हाती लागल्यास त्याचा वापर करून प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात प्रचार केला जातो.

केवळ उमेदवार नव्हे, उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले, स्वपक्षातील विरोधकास उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेलेही खासगी गुप्तहेर कंपन्यांकडे येतात, असे त्यांनी सांगितले. जीडीएक्स गुप्तहेर कंपनीचे महाव्यवस्थापक महेशचंद्र शर्मा यांनी प्रत्येक निवडणुकीत अनेक जण आमची मदत घेतात, अशी कबुली दिली. एका ग्राहकाकडून अंदाजे १ ते ६० लाख रुपये घेतले जातात.प्रतिस्पर्धी नेत्यांवर अशी ठेवतात पाळतप्रतिस्पर्धी उमेदवाराची संपूर्ण माहिती गोळा केली जाते. त्यात सोशल मीडियावरील अपडेट्सपासून ते नजीकच्या सर्व आप्तेष्टांची माहिती जमविली जाते. उमेदवाराचा फोन 'ट्रॅक' केला जातो. त्याच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दोघा-तिघांना योजनापूर्वक पाठविले जाते. जमवलेल्या माहितीतून स्फोटक माहिती शोधली जाते. मोठी रक्कम मोजणाऱ्या ग्राहकाला प्रतिस्पर्धी उमेदवार वा त्याच्या जवळच्या व्यक्तीला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे आश्वासनही या कंपन्या देत असतात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक