शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
5
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
6
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
7
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
8
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
9
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
10
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
11
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
12
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
13
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
14
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
15
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
16
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
17
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
18
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
19
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
20
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले

दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार: भारत-चीन सैन्याचा संयुक्त सराव

By admin | Published: November 17, 2016 1:35 AM

भारत आणि चीन या दोन्ही देशांसमोर दहशतवादाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दहशतवादाचा बीमोड करायचा असेल, तर दोन्ही देशांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे.

पुणे : भारत आणि चीन या दोन्ही देशांसमोर दहशतवादाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दहशतवादाचा बीमोड करायचा असेल, तर दोन्ही देशांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन्ही देशांचा संयुक्त लष्करी सराव अत्यंत उपयुक्त ठरेल. या सरावातून एकमेकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शांतता प्रस्थापित करता येऊ शकेल, असा निर्धार भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला. भारत आणि चीन यांच्या संयुक्त लष्करी सराव २०१६च्या माध्यमातून जगापुढे वेगळा आदर्श निर्माण करता येऊ शकतो, अशी आशाही या वेळी व्यक्त करण्यात आली. ‘भारत-चीन ट्रेनिंग एक्सरसाईज हँड इन हँड २०१६’ या उपक्रमाच्या सहाव्या पर्वाचे बुधवारी पुण्यात उद्घाटन झाले. या वेळी जवानांचे पथसंचलन, निशानटोली, थरारक प्रात्यक्षिके यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या वेळी भारताचे मेजर जनरल योगेशकुमार जोशी आणि चीनचे मेजर जनरल वांग हायजीआंग हे मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी दोन्ही देशांतील राष्ट्रगीतांचे सादरीकरण करण्यात आले.संयुक्त लष्करी सरावाचे हे सहावे वर्षे आहे. हा उपक्रम भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये संलग्नपणे राबवला जातो. १६ ते २७ नोव्हेंबरदरम्यान हा सराव पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दक्षिण आशियाई देशांमध्ये शांतता, स्थैैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत आणि चीनच्या भौगोलिक परिस्थितीत साधर्म्य आहे. त्यामुळे दहशतवादाचा सामना करताना एकमेकांना साहाय्य करता येईल. सरावादरम्यान हेलिबॉर्न आॅपरेशन, एकमेकांची शस्त्रे हाताळणे, एक्सप्लोझिव्ह उपकरणांची माहिती घेणे, लढा देण्याच्या दृष्टीने करण्यात येणारी तयारी आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत होतील, अशी माहिती भारताचे लष्कराचे अधिकारी अलोक चंद्रा आणि चीनचे चांग चियालिंक यांनी दिली. (प्रतिनिधी)