मुंबई : रामचंद्र सुरीश्वर समुदायाचे आचार्य विजय महाबल सुरीश्वरजी महाराज यांचे शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी पालिताना येथे संथारायुक्त देवलोक गमन झाले. ते ९७ वर्षांचे होते. गुजरातमधील शत्रुंजय तीर्थ (पालिताना) येथील महाराष्ट्र भवनामध्ये त्यांच्या संथाराव्रताची समाधीपूर्वक सांगता झाली.आचार्य पुण्यपाल सुरीश्वर यांनी अंतिम समयी त्यांच्यासाठी अरिहंत पद म्हटले. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ दीक्षा जीवन जगलेले महाबल सुरीश्वर महाराज यांनी त्यांची अवघी हयात धर्म, आध्यात्म, तपस्या आणि परोपकारामध्ये व्यतित केली. त्यांची पालखी यात्रा आज शनिवारी निघणार आहे. महाराजांच्या देवलोक गमनाचे वृत्त कळताच सर्व जैन धर्मीयांना अतिव दु:ख झाले. देशभरातील त्यांचे भक्तगण अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी पालिताना येथे पोहोचत आहेत. त्यांची अंत्ययात्रा जगजीवन फुलचंद भावनगरवाला धर्मशाळा येथून निघणार आहे. महाबल महाराज २५ वर्षांपासून आचार्य पदावर होते. त्यांनी अनेक श्रावकांना दीक्षेच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त केले. (प्रतिनिधी)
जैन संत महाबल सुरीश्वर यांचे संथारायुक्त देवलोक गमन
By admin | Published: October 01, 2016 1:14 AM