मंबई : औरंगाबादचे नामांतराच्या वाादात अडकण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी आपल्या एसी रुममधून बाहेर पडून विकास करुन दाखवावा, असा टोला काँग्रेस आ. नितेश राणे यांनी हाणला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. कोकणातील केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध हा ‘सेटलमेंट’साठी आहे. कोकणाच्या विकासासाठी विधिमंडळात चर्चेची मागणी केल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना कोकणात जाता यावे यासाठी स्वाभिमान संघटनेच्यावतीने विशेष बससेवा सुरु करण्यात येणार आहे. अवघ्या १०० रुपयात कोकणात जाता येणार असून १२, १३, १४ आणि १५ सप्टेंबरला मुंबई, वसई विरार, नालासोपारा, डोंबीवली येथून बसेस सोडण्यात येतील. यासाठी इच्छुकांनी ५ ते १० सप्टेंबरपर्यंत स्वाभिमानच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन राणे यांनी केले. आवश्यकता भासल्यास स्वाभिमानच्यावतीने परतीच्या प्रवासाची सोय करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याांनी वर्षातून एकदा कोकणात येण्याऐवजी थोड्या जास्त फे-या केल्या तर त्यांना कोकणवासियांच्या समस्या अधिक कळतील, अशी कोपरखळीही राणे यांनी लगावली.
‘औरंगाबादच्या नामांतराऐवजी विकास करून दाखवा’
By admin | Published: September 01, 2015 1:24 AM