शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

१७ हजार गावांमधील जलस्रोतांचा विकास करणार

By admin | Published: April 10, 2017 4:22 AM

राज्यातील १७ हजार गावांतील तलाव, विहिरी, नद्या आणि इतर जलस्रोतांचा विकास करण्याच्या अभियानाची सुरुवात

मुंबई : राज्यातील १७ हजार गावांतील तलाव, विहिरी, नद्या आणि इतर जलस्रोतांचा विकास करण्याच्या अभियानाची सुरुवात, रविवारी जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशनतर्फे (जिओने) करण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त आॅगस्ट क्रांती मैदानात रविवारी सायंकाळी आयोजित विशेष कार्यक्रमात जिओने ही घोषणा केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महावीर यांची महाआरती पार पडली. जिओच्या संचालकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.विविध सामाजिक उपक्रमांतून महिलांमध्ये जनजागृती करणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या ट्रस्टला जिओतर्फे ३९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ८०० मुलांचा शैक्षणिक खर्चही जैन बांधवांनी उचलला. अवयव, श्रम आणि धन यांच्या दानामध्ये जैन समाजाचा मोलाचा वाटा आहे. या समाजाच्या मोलाच्या वाट्यामुळेच देश प्रगतिपथावर आहे. लवकरच देश प्रगतिशील वर्गामधून प्रगत देशांच्या यादीत गेलेला दिसेल, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जैन समाजाने ताकदीनीशी केलेल्या मतदानामुळे ऐतिहासिक विजय मिळाला. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आशीर्वाद मागितला होता. तो मतदानातून दिला. देशासह जगाला महावीरांच्या विचारांची गरज आहे.निसर्गाचा प्रकोप ही मोठी समस्या समोर उभी आहे. सर्वांना जगण्याचा अधिकार असून, संतुलन निर्माण करण्यासाठी महावीरांच्या विचारांचे पालन करायला हवे. गोरक्षण हा त्याचाच भाग आहे. म्हणूनच पशुधनातून नैसर्गिक खतांच्या माध्यमातून जमिनीची पत वाचवायला हवी. भगवान महावीरांच्या विचाराने काम करत राहाणार,’ असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.जैन संत नयपदम सागर महाराज यांनी उपस्थित जैन बांधवांना मार्गदर्शन केले. या वेळी जैन समाजासाठी स्वस्तात औषधे आणि एका मेडिक्लेम योजनेची घोषणा करण्यात आली, तसेच साध्वी श्री मयणाश्री यांनी २५ वर्षांपेक्षा लहान वय असलेल्या मुला-मुलींच्या लग्नाचा कायदेशीर हक्क आई-वडिलांकडे असावा, अशी मागणी सरकारकडे केली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सनदी अधिकारी उपस्थित होते. महावीर जन्मोत्सवानिमित्त मुंबईत विविध ठिकाणी सात लाख लाडवांचे वाटप जिओने केले. या वेळी केंद्रीय विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. (प्रतिनिधी)महावीर जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन व्हावा - राज्यपालभगवान महावीरांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी रविवारी केले. भारत जैन महामंडळ यांच्या वतीने पाटकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आचार्य पदमानंदजी महाराज, मुनी महेंद्र कुमार, आमदार राज पुरोहित, राजेंद्र पटणी, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंदडा, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष के.सी. जैन, तरुण जैन, पृथ्वीराज कोठारी, के.सी. सेठी, प्रमोद कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.आज जगात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण निर्माण होत असताना भगवान महावीरांचा सर्व मतांचा आदर करण्याची शिकवण देणारा अनेकांतवाद व अहिंसा जगाला विनाशापासून वाचवून शांती, समृद्धी व विकासाच्या वाटेवर नेऊ शकते, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.