शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सेंद्रीय शेती विकसित करणार

By admin | Published: January 19, 2015 12:52 AM

सेंद्रीय शेती कशी विकसित करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. ग्राहकांना सेंद्रीय शेतीतून पिकविलेले धान्य, भाजीपाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

नितीन गडकरी : पूर्ती सुपर बाजारच्या मनीषनगर शाखेचे उद्घाटन नागपूर : सेंद्रीय शेती कशी विकसित करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. ग्राहकांना सेंद्रीय शेतीतून पिकविलेले धान्य, भाजीपाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. ही संधी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी रिटेलच्या क्षेत्रातील एक हेवीवेट कंपनी आमच्याशी जुळण्याच्या तयारीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.मनीषनगर येथील सेंट्रल इंडिया मध्यवर्ती बहुउद्देशीय सहकारी संस्थेतर्फे संचिलत पूर्ती सुपर बाजारचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान आणि विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ कोकण बँकेचे अध्यक्ष श्रीकांत कारापूरकर व महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. गडकरी म्हणाले, पूर्ती सुपर बाजारने ग्राहकांच्या हितासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पात २५० महिलांचे बचत गट संलग्न आहेत. ४५० गरीब महिलांना यातून रोजगार मिळाला आहे. समाजाने समाजासाठी चालविलेला हा उपक्रम आहे. पूर्तीच्या माध्यमातून छोट्या-छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊन रोजागाराचे दारे उपलब्ध करून दिली आहेत. राजकारणाचा उपयोग सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकारातून साकारलेल्या पूर्ती सुपर बाजारचा नफा कमाविण्याच्या उद्देश नाही, तर ग्राहकांना माफक दरात, दर्जेदार व योग्य वजनात वस्तू मिळाव्यात ही पूर्तीची मूळ संकल्पना आहे. सहकारात प्रामाणिकता हा निकष आवश्यक आहे. पूर्ती सुपर बाजाराने हा निकष पाळल्यामुळे त्यांची उलाढाल येत्या पाच वर्षात शंभर कोटी पर्यंत जाईल. येत्या काळात पूर्ती बाजारच्या शाखा संपूर्ण राज्यासोबतच इतर राज्यातही असतील असा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पासवान म्हणाले, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने आम्ही संशोधन सुरू केले आहे. ग्राहकांच्या संरक्षणासाठी लवकरच आवश्यक पावले उचलल्या जातील. सर्वसामान्यांचा विकास साधायचा असेल तर सहकार हे क्षेत्र मोठे आहे. या क्षेत्रात राहून तुम्हाला ग्राहक, शेतकरी व इतर वर्गाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर व महाराष्ट्र देशात क्र मांक एक वर राहील अशी खात्री आहे, असेही ते म्हणाले.प्रास्ताविक पूर्ती सुपर बाजारचे अध्यक्ष रवी बोरटकर यांनी केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून मुख्यमंत्र्यांनी पूर्ती बाजारचे उद्घाटन केले. या कार्यक्र मास आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, माजी महापौर संदीप जाधव, देवदत्त मराठे, दीपक सप्तर्षी उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार पूर्ती सुपर बाजारचे सचिव राजू हडप यांनी मानले. कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणाताई खानोलकर, सशांक काटकर, राजेश रामटेके, विश्वजीत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)