मुंबई : राज्यातील १० विमानतळांचा विकास करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याशी राज्य शासनाचा सामंजस्य करार २३ आॅगस्टला होणार आहे. त्यासाठीच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विविध सवलती देण्यात येणार आहेत. विमानतळांची प्रादेशिक जोड योजना अमलात आणण्याचे केंद्राचे धोरण आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १० शहरांतील विमानतळांचा समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. या सवलती देणारइंधनावरील मूल्यवर्धित त कराचा दर १० वर्षांसाठी एक टक्का इतका करण्यात येईल. विमानतळांच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक तेवढी जमीन विनामूल्य देणार. विमानतळांना रस्ते, रेल्वे, मेट्रो, जलवाहतुकीचे मार्ग आदींनी जोडण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)
राज्यातील १० विमानतळांचा विकास
By admin | Published: August 23, 2016 6:28 AM