शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भाजपाच्या साथीने बीडीडीचा विकास, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमीपूजन

By admin | Published: April 22, 2017 1:40 PM

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 -  बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 32 टक्के जमिनीवर विकास करणार. मुंबईच्या पुनर्विकासाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असं आश्वासन दिलं. तसंच बीडीडीची जमीन ही सोन्याचा तुकडा असून बीडीडीच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा होता असंही सांगितलं. इच्छाशक्तीच्या अभावामुळे काम आधी झाले नाही असा टोलाही त्यांना यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादीला लगावला. वरळीच्या जांबोरी मैदानात भव्य सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 
 
डिलाईल रोड, नायगाव, वरळी आणि शिवडी या परिसरात तब्बल २०७ बीडीडी चाळी आहेत. अवघ्या १६० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये १६ हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. वर्षानुवर्षे मागणी, बैठका, निवदने आणि आंदोलनानंतरही ब्रिटिशांच्या काळात उभारलेल्या आणि जीर्ण झालेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नाही. फडणवीस सरकारने अडीच वर्षांत जलदगतीने पावले उचलत प्रकल्पाची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात डिलाईल रोड आणि नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास केला जाणार असून, त्यासाठी कंत्राटदारांची नियुक्तीदेखील करण्यात आली. डिलाईल रोड येथील चाळींचे काम शापूरजी अँड पालोनजी तर नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास एल अँड टी या कंपनीमार्फत केला जाणार आहे. वरळी येथील प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच कंत्राटदाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे सध्या १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासानंतर ५०० चौरस फुटांचे घर मोफत मिळणार आहे.
 
भाजपाच्या या आक्रमक श्रेयमोहिमेमुळे शिवसेना आणि काँग्रेसची मात्र पूर्ण कोंडी झाली आहे. नायगाव भागात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार असून, वरळीत शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत. तर, नगरसेवकांमध्ये शिवसेना आघाडीवर आहे. इतकी वर्षे पाठपुरावा करूनही ऐनवेळी सारे श्रेय भाजपाच्या वाट्याला जाणार अशी चिन्हे आहेत. शिवसेनेने स्थानिक पातळीवर पुनर्विकास प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, भाजपाच्या भव्य सोहळ्यासमोर तो तोकडा आहे.
 
नायगावातील काँग्रेसची स्थिती अगदीच केविलवाणी झाली आहे. काँग्रेसचे कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोळंबकरांचे तळ्यातमळ्यात सुरू असल्याने काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यातच कोळंबकरांनी आपल्या पोस्टरवर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचेच छायाचित्र छापल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे.