शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

लोकशाहीच्या चार स्तंभाच्या कार्यातूनच समाजाचा विकास

By admin | Published: December 20, 2015 1:56 AM

लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रत्येकाजवळ स्वत:ची अशी एक सत्ता आहे.

नागपूर : लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रत्येकाजवळ स्वत:ची अशी एक सत्ता आहे. त्यामुळेच प्रत्येक स्तंभाच्या सत्तेने आपले कार्य समाजाच्या कल्याणासाठीच केले पाहिजे. लोकशाहीचे हे चारही स्तंभ मजबूत असतील तर समाजाचा विकास गतीने साधता येणे शक्य आहे. यात प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे; कारण प्रसारमाध्यमांचा प्रभाव इतर तीन स्तंभांवर पडतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र उपस्थित होते. कार्यक्रमात ‘आजची पत्रकारिता आणि शासन’ विषयावर वेदप्रकाश वैदिक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमतने राज्याच्या कानाकोपऱ्यात एक लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून पोहोचण्याचा प्रयत्न केला. केवळ वृत्तपत्र म्हणून न राहता लोकमतने एका सामाजिक चळवळीचे स्वरूप घेतले आणि समाजातील तळागाळातल्या माणसांच्या वेदना मांडण्याचे काम केले. त्यामुळेच हे वृत्तपत्र लोकप्रिय होऊ शकले आणि लोकांचा विश्वास जिंकू शकले. या पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे लेखन उल्लेखनीय आहे. समाजातील अखेरच्या माणसाच्या प्रश्नांकडे, वेदनेकडे लक्ष वेधण्याचे काम या विजेत्यांनी केले आहे. विरोधी पक्षाला विधानभवनात आपले म्हणणे मांडण्यासाठी वृत्तपत्र हाच महत्त्वाचा स्रोत असतो. त्यामुळेच पत्रकारिता निर्भीड आणि सत्यावर आधारित असली पाहिजे. आपण जे लिहितो आहोत त्याने समाजाचे काय भले होणार? याचा विचार पत्रकारांनी केला पाहिजे. पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी यांनी समाजाभिमुख पत्रकारिता केली. त्यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नावाने असलेल्या या पुरस्कारासह त्यांच्या आदर्शाचीही प्रेरणा पत्रकारांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन लोकमत मुंबईचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी तर आभार लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले यांनी मानले. (प्रतिनिधी)लोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही तर उज्ज्वल परंपरा- सुरेश द्वादशीवारलोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही तर एक उज्ज्वल परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी या वृत्तपत्राला लोकमत हे नाव दिले. लोकनायक बापूजी अणे यांनी लोकमत हे साप्ताहिक चालविले आणि त्यानंतर श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी ते अर्धसाप्ताहिक आणि दैनिक केले. यामागे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची, प्रबोधनाची आणि सामाजिक दायित्वाची परंपरा आहे. त्यामागे एक इतिहास आहे. या परंपरेच्यावतीने विजेत्या पत्रकारांचा सत्कार होत आहे, ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र फाऊंडेशनच्यावतीने ललित आणि वैचारिक साहित्यातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार सुरेश द्वादशीवार यांना जाहीर झाला. यानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.