वर्धने एनआयटीत, हर्डीकर महापालिकेत, कांबळे खनिकर्म महामंडळातनागपूर : महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांची नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती या पदावर तर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे यांची राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर बदली झाली आहे. मुंबईच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे.नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच शहराच्या विकासाशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून येत्या काळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. श्याम वर्धने यांनी अडीच वर्षापूर्वी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक योजनांना गती दिली. आता त्यांच्यापुढे नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती म्हणून मेट्रो रेल्वेसारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे.उत्कृष्ट काम करून दाखविणारनागपूर हे मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शहरात महापालिका आयुक्त म्हणून काम करणे एक प्रकारे आव्हान जरी असले तरी ते स्वीकारून चांगले काम करून दाखविण्याचा प्रयत्न राहील.श्रावण हर्डिकर, नवे महापालिका आयुक्तसमाधानकारक कारकीर्दनागपूर शहरात मी जन्माला आलो. शहरातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे. रामझुला, दहिबाजार पुलाचे काम पूर्ण करण्यात यश आले. जेएनएनयूआरएम अंतर्गत १९०० कोटींचे १९ प्रकल्प हाती घेण्यात आले. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही यातील ११ प्रकल्प पूर्ण झाले. ८ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.श्याम वर्धने, मावळते आयुक्त
विकासाची ट्रीपल गाडी
By admin | Published: January 04, 2015 1:03 AM