'कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते', भाजपकडून फडणवीसांचा व्हिडीओ शेअर; तासाभरानंतर सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 09:41 PM2023-10-27T21:41:46+5:302023-10-27T21:42:17+5:30
Devendra Fadanvis : महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन' या आशयाचा व्हिडीओ शेअर केला, पण तासाभरात व्हिडीओ डिलीट करण्यात आला.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात अनेक राजकीय भूकंप झाले आहेत. यातच आता भाजपने आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे चर्चांना उधाण आले. या व्हिडिओमध्ये फडणवीस 'मी पुन्हा येईन', असे म्हणताना दिसत आहेत. तासाभरानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. आता याबाबत भाजपने स्पष्टीकरण दिले आहे.
Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडिओमुळे तासभर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. पण, नंतर हे ट्वीट डीलिट करण्यात आले. आता महाराष्ट्र भाजपकडून या बाबात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 'जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेला आहे. यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. या आधीच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये', असे स्पष्टीकरण भाजपचे प्रकवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया मर्यादित आहे
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 27, 2023
जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आता पर्यत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते.
या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका… https://t.co/zsXjSYdi66
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्र भाजपने केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेने हे ट्विट केले का, हे मला माहिती नाही. कार्यकर्ता म्हणून मला विचाराल तर आनंद वाटणे स्वाभाविक आहे. देवेंद्र फडणवीसांनी आधीच सांगितले आहे की, एकनाथ शिंदेंच्या नेृत्वाखाली आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे असा काही विषय असेल, असे मला वाटत नाही,' अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.