Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 08:54 PM2023-10-27T20:54:54+5:302023-10-27T20:55:38+5:30

महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट केला, थोड्यावेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले.

Devendra Fadanvis: 'I'll come again, I'll come again'; BJP's tweet sparked discussions | Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

मुंबई- 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे 'मी पुन्हा येईन' हे वाक्य खूप चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा हेच वाक्य चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे, महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X अकाउंटवरुन देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत 'महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन', असे कॅप्शन दिले. पण, थोड्या वेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले.

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप आले. आधी शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सामील होऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. या सर्व राजकीय भूकंपानंतर आता भाजपच्या ट्विटमुळे नवीन चर्चेला तोंड फुटले. ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस 'मी पुन्हा येईन' म्हणत असल्याचे दिसत होते. हे ट्विटनंतर डिलीट करण्यात आले, पण यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, "शेवटी एवढच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन, याच निर्धाराने, याच भूमिकेत. याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी. गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन."

दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला होता. अजित पवारांना याबाबत विचारले असता, त्यांनी या दौऱ्याची माहिती नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता आज भाजपकडून हे ट्विट करण्यात आले आहे. याबद्दल विचारले असता, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काहीच कल्पना नसल्याची प्रतिक्रिया दिली. या ट्विटमागचे कारण काय, हे येत्या काही दिवसांत कळेलच.
 

Web Title: Devendra Fadanvis: 'I'll come again, I'll come again'; BJP's tweet sparked discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.