शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

"एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा धुर काढलाय...", चित्रा वाघ यांचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 12:13 PM

'अकेला देवेंद्र क्या करेगा?' म्हणणाऱ्या नेत्यांचा चित्रा वाघ यांनी खरपुन समाचार घेतला आहे.

शिरुर: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अनेकदा टीका करीत असतात. आताही राज्यसभेच्या निवडणुकांवरुन सरकारमधील मंत्र्यांकडून फडणवीसांवर टीका होत आहे. 'अकेला देवेंद्र क्या करगा,' अशाप्रकारचे वक्तव्य सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडेतोर उत्तर दिले आहे. 

'अकेला देवेंद्र क्या करेगा..?'शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे महिला मेळाव्यात बोलताना चित्रा वाघ म्हणाल् का, ''अकेला देवेंद्र क्या करेगा? अशी टीका महाविकास आघाडी सरकारमधील नेते करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद आहे, पण एकट्या देवेंद्र फडणवीसांनीच तुमच्या तिघांचा धुर काढलाय. आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय'', अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

'तिसरी जागाही आम्ही जिंकणार'त्या पुढे म्हणाल्या की, "राज्यसभेच्या दोन जागा तर आम्ही जिंकणारच, मात्र तिसरी जागाही सहज जिंकू.'' यावेळी वाघ यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेवरही भाष्य केले. "राज्यातील सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिक जाण्यासाठी घाबरतोय. मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवत नाहीत, तर गोरगरीबांनी तरी कसा विश्वास ठेवायचा? कोरोना काळात राज्यातील नेत्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले, या नेत्यांची बिलही समोर आली," असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी