मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 04:16 PM2024-12-11T16:16:03+5:302024-12-11T16:16:45+5:30

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारचा शपथविधीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहेत.

Devendra Fadnavis and Ajit Pawar on Delhi visit before cabinet expansion, Eknath Shinde in Mumbai | मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारचा शपथविधीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहेत. या महिन्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतच आहे.

मुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने पीटीआयला सांगितले आहे.

शिंदेंना गृहमंत्रालय मिळणार नाही?
पीटीआयशी बोलताना भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, शिवसेनेला गृहखाते आणि महसूल खाते दिले जाण्याची शक्यता नाही. महायुतीत तीन पक्ष आहेत, आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी तिन्ही पक्षांशी चर्चा करणे गरेजेच आहे. अंतिम चर्चा झाल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार जाहीर केला जाईल. मात्र, 14 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृह विभाग त्यांच्याकडे होता. आता एकनाथ शिंदे गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी द्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण, भाजप शिवसेनेला गृहखाते देण्यास इच्छूक नाही. आता यावर काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

असं असेल संभाव्य मंत्रिमंडळ
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. यापैकी भाजपच्या वाट्याला 21 ते 22 मंत्रिपदे मिळू शकतात. तर, शिंदेंना 10-12 आणि अजिप पवारांना 9-10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Devendra Fadnavis and Ajit Pawar on Delhi visit before cabinet expansion, Eknath Shinde in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.