Devendra Fadnavis vs Ajit Pawar: "ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही..."; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:58 PM2022-07-15T17:58:16+5:302022-07-15T17:59:27+5:30

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यांचा घेतला खरपूस समाचार

Devendra Fadnavis angry on Ajit Pawar over Petrol Diesel Prices Reduced in Maharashtra Eknath Shinde Government | Devendra Fadnavis vs Ajit Pawar: "ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही..."; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis vs Ajit Pawar: "ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही..."; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Next

Petrol Diesel Prices in Maharashtra: राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या ( CM Eknath Shinde ) नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंधनाचे दर काही अंशी कमी करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. ही दर कपात राज्यात मध्यरात्रीपासून लागूदेखील झाली. पण कर कपात तुटपुंजी असल्याचे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ( Ajit Pawar) म्हटले. त्यावर फडणवीसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
 
"ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही, त्यांना बोलायचा अधिकार तरी काय आहे? मला तर आश्चर्य वाटते की ही मंडळी आता बोलू तरी कशी शकतात. इतकी मागणी होऊनसुद्धा त्यांनी निर्णय घेतला नव्हता. खुद्द पंतप्रधानांनी विनंती करूनही ठाकरे सरकारच्या लोकांनी निर्णय घेतला नाही. आणि आता आम्ही लोकांच्या भल्यासाठी ही गोष्ट करत असताना हे लोक आम्हाला विचारत आहेत. आम्ही लोकांसाठी निर्णय घेत दर कपात केली आहे आणि भविष्यात दर आणखी कमी करू", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारासंह इंधन दर कपातीच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

अजित पवार नक्की काय म्हणाले होते?

"पेट्रोल आणि डिझेलवरील काही प्रमाणात टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी अडीच वर्ष अर्थमंत्री राहिलोय. मागील अर्थसंकल्पात गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात कमी केल्या होत्या. साडे तेरा टक्क्यांचा टॅक्स तीन टक्क्यांवर आणला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे मागणी करत होते की, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील दरात ५० टक्क्यांची कपात करावी. मग आता तेच सत्तेत असताना ५० टक्के टॅक्स कमी का नाही केला? विरोधात असताना मागणी करायची, अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची", असा टोला अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला होता.

छगन भुजबळांनीही केली दर कपातीच्या निर्णयावर टीका

"भाजपचे केंद्रातील सरकारपेक्षा राज्यातील सरकार अधिक हुशार निघाले. कारण एकीकडे राज्य सरकारने सर्व वस्तूंवरील जीएसटी ५ टक्क्यांनी वाढविला, वीज बिल वाढवलं, एलपीजी ५० तर सीएनजी ४ रुपयांनी महाग केलं आणि दुसरीकडे केवळ ५ रुपयांनी पेट्रोल आणि ३ रुपयांनी डीझेल कमी केले. हे सरकार किती हुशार आहे ते यावरूनच समजतं. एखाद्याचे सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायचा अशी पेट्रोल व डिझेलची दरकपात आहे", अशा शब्दांत छगन भुजबळांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

Web Title: Devendra Fadnavis angry on Ajit Pawar over Petrol Diesel Prices Reduced in Maharashtra Eknath Shinde Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.