राष्ट्रवादीने आमच्यासोबत का यावे? कारण दिसत नाही; फडणवीसांचे चार दिवस आधीचे वक्तव्य अन् आज...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 06:40 PM2023-07-03T18:40:26+5:302023-07-03T18:42:03+5:30
Devendra Fadnavis ANI Interview: ड्रायव्हिंग सीटवर शरद पवारच आहेत, नेतृत्व हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा, दोनदा नाही तर तिसऱ्यांदा राजकीय भूकंप आणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयला स्फोटक मुलाखत दिली आहे. यामध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत खुलासे, शरद पवार यांच्याबाबत मत व्यक्त केले आहे. स्मिता प्रकाश य़ांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये चार दिवस आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत येण्याचा कारण दिसत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.
पारिवारीक पक्षांमध्ये आपला उत्तराधिकारी निवडला जातो. शरद पवारांनी इथे सुप्रिया सुळेंना निवडले आहे. राजकारणाला जाणणारे म्हणून त्यांना ओळखले जाते. शरद पवारांना जर मागच्या सीटवर जायचे असते तर त्यांनी सुळेंना अध्यक्ष बनविले असते. राज्याचा बनविला असता, प्रफुल्ल पटेलांनाही बनविले आहे. त्यांनी नेतृत्व हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ड्रायव्हिंग सीटवर पवारच आहेत, विरोधकांना एकत्र आणण्यात पवारच आहेत आणि जे एकमेकांची तोंडं पाहू शकत नाहीत त्यांनाही समोरासमोर आणण्याची हिंमत पवार साहेबांमध्ये आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांचे राजकारण कसे असते ते सांगितले.
राष्ट्रवादी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयोग सोडून तुमच्यासोबत आली तर असा सवाल स्मिता प्रकाश यांनी केला. यावर फडणवीस यांनी का येणार, काही कारण दिसत नाही. राष्ट्रवादी ही शरद पवारांची मालकी आहे. त्यांनी त्यांचे मन बनविले आहे की विरोधकांसोबत जावे, असे फडणवीस म्हणाले.
कोणा राजकारण्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारणी व्हावा यास आमचा विरोध नाहीय. परंतू, राजकारण्याचा मुलगा आहे म्हणून तो वरच्या पदावर जावा, त्याच्यात नेतृत्व गुण नसले, समजूतदारपणा नसला तरी त्याला हे सर्व मिळावे याला आमचा विरोध आहे. मोदींच्या येण्यानंतर हे कमी होऊ लागले आहे. लोकांची सेवा करणार त्यांचेच परिवारवाद चालणार असे फ़डणवीस म्हणाले.
ठाकरेंवर खुलासा...
ठाकरे आणि आमच्यात कटुता नाही. २०१९ पर्यंत नव्हते. मी त्यांच्या घरी देखील जायचो. मला सर्वात मोठे दु:ख वाटते, राजकीय दृष्ट्या तुम्हाला वाटले की वेगळे व्हावे तर फोन करून ते सांगण्याची हिंमत असावी. देवेंद्र माझे विचार वेगळे आहेत. मला वेगळ्या मार्गाने जायचे आहे, असे सांगायला हवे होते. पाच वर्षे जो व्यक्ती मला मध्य रात्री फोन करायचा, जो मी केल्यावर घ्यायचा त्या व्यक्तीने माझे फोन उचलले नाहीत. त्यांच्या पीएने साहेब बोलणार नाहीत, असे सांगितले. थोडा आत्मसन्मान असलेल्यांसाठी ते चुकीचे वाटते. मी कुठेतरी बदल्याचा शब्द वापरला होता, पण तो चुकीचा होता. मी शिवसेनेवर सूड उगवला नाही. परंतू, पलटवार करायचा होता, तो मी केला, अशी कबुली फडणवीस यांनी दिली.
मी त्यांच्या कुटुंबावर कधीही वार केला नाही. ते मुख्यमंत्री होते, चार्जशीटवर ज्या गोष्टी नोंद आहेत, ते काही लिप्स चॅट नव्हते. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ते केले गेले होते. त्यांनी माझ्यावर वार केला म्हणून मी त्यांना ओपन चॅलेंज दिले. एक जरी गोष्ट असेल तर त्यांनी समोर आणावी, असे फडणवीस म्हणाले. मी असे म्हणत नाही की मी जगातील सर्वात इमानदार आहे. मी माझ्या आयुष्यात तेव्हाच क़ॉम्प्रोमाईज केले जेव्हा गरजेचे होते. जसे अजित पवारांसोबत केले. कारण मला जिवंत रहायचे होते. जिवंत राहिलो तर राजकारणात राहिन, मी कोणाच्या गोष्टीत घुसत नाही. आणि घुसलो तर सोडत नाही, असे फडणवीस म्हणाले.