मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधी सत्तधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथ आपल्या महाजनादेश यात्रेतून इव्हीएमवरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे ह्या निवडुन आल्यातर इव्हीएम चांगले, मात्र गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रतीम मुंडे ह्या निवडून आल्यावर इव्हीएम मशीन खराब असा कांगावा विरोधक करत आहेत. असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपचे सरकार येताच विरोधक म्हणतात आम्हाला इव्हीएमने हरवले. मात्र २००४ पासून २०१४ पर्यंत प्रत्येक निवडणुका इव्हीएम वरच झाल्या आहेत. तेव्हा पंजाब पासून तर संसदेपर्यंत विरोधकांना विजय मिळाला होता. तेव्हा हेच इव्हीएम चांगलं होत.मात्र मोदी सरकार येताच इव्हीएम खराब झालं. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे ह्या निवडुन आल्यातर इव्हीएम चांगले, मात्र गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रतीम मुंडे ह्या निवडून आल्यावर इव्हीएम मशीन खराब असल्याचा दावा विरोधक करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
इव्हीएम खराब नसून विरोधकांचे डोके खराब आहेत. त्यमुळे तुम्ही आता जनतेतून निस्त नाबूत झाला आहात असा खोचक टोला यावेळी मुख्यमंत्री यांनी विरोधकांना लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सभेला गर्दी जमत नाही, कारण यांच्यावरील विश्वास आता जनतेतून उडाला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.