शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
3
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
4
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
5
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
6
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
7
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
8
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
9
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
10
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
11
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
12
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
13
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
14
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
15
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
16
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
17
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
19
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'

जितेंद्र आव्हाडांचे 'ते' विधान रामभक्तांचा अपमान करणारं; देवेंद्र फडणवीस संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 6:04 PM

महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील असं विधान करणे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

मुंबई - रामनवमी, हनुमान जयंती केवळ दंगली घडवण्यासाठीच आहेत का? असं वाटतं हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. मुंबईत राष्ट्रवादीच्या शिबिरात ते बोलत होते. मात्र आव्हाडांच्या या विधानावरून आता भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात हिंदू सणांचा अपमान केल्याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाडांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. 

मुघलांपेक्षाही भयंकर लोक सत्तेत, मुंबईत जातपात नाही हे सांगू नका - जितेंद्र आव्हाड

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांचे हे विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. रामनवमी असेल वा हनुमान जयंती अत्यंत शांतपणे साजरी केली जाते. लोकांच्या मनात प्रभू श्रीरामाप्रती, हनुमान यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे. ही श्रद्धा उत्सवानिमित्त व्यक्त केली जाते. त्यामुळे दंगलीकरता अशाप्रकारे रामनवमी, हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणं हे समस्त समाजाचा, रामभक्तांचा अपमान आहे. हे विधान अतिशय चुकीचे आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील असं विधान करणे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही ठरवलंय का दंगली घडवायच्या? असा त्याचा अर्थ आहे का? हा प्रश्नही आम्हाला उपस्थित होतो. अशा परिस्थितीत नेत्यांनी संवेदनशील वागले पाहिजे आणि संवेदनशील बोलले पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणे योग्य नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे. 

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?देशात द्वेषाचे राजकारण जास्त होतेय, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येतो आणि मुस्लिमांबद्दल वाटेल ते बोलतो. महाराष्ट्र नंपुसक सरकार आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालेत की काय? कधी नव्हे तेवढे वातावरण खराब झालंय. येणारे वर्ष हे जातीय दंगलीचे असेल. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही. नोकऱ्या देऊ शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही त्यात सर्वात सोप्पं म्हणजे धार्मिक सोहळे करा, त्या सोहळ्यातून मते जमा करा आणि नाही जमले तर आग लावा. दंगली कशा प्लॅन केल्या जातात याचा मी साक्षीदार आहे. मी स्वत: उभं राहून अनुभव घेतलाय. मला दंगल कुणी समजवू नये असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस