स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे इतिहास विसरले- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 12:44 PM2023-04-04T12:44:20+5:302023-04-04T12:44:32+5:30

"तुम्ही सावरकरही नाही आणि तुम्ही गांधीही नाही"

Devendra Fadnavis forgot the history that called independence hero Savarkar an apologist | स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे इतिहास विसरले- देवेंद्र फडणवीस

स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणारे इतिहास विसरले- देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना देशाचा इतिहास माहीत नाही. जे सावरकरांना माफीवीर म्हणतात त्यांच्यासाठी आम्हाला यात्रा काढावी लागते. राहुल गांधी तुम्ही कधी सावरकर होऊ शकत नाही. तुम्ही सावरकरही नाही आणि तुम्ही गांधीही नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कांदिवलीमध्ये आयोजित सावरकर गौरव यात्रेत केली.

जे लोक स्वातंत्र्यवीरांना माफीवीर म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसतात. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांनीच सावरकरांना गौरविले. जेव्हा जेव्हा सावरकर यांचा अपमान केला जाईल, तेव्हा जनता रस्त्यावर उतरेल. राहुल गांधी तुम्ही सावरकर होऊ शकत नाही आणि गांधीही. तुमचे आजोबा फिरोज गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव संसदेत मांडला होता, याची तरी माहिती आहे काय? असा सवाल फडणवीस यांनी केला.

खरी शिवसेना आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही राहुल गांधी यांच्या फोटोला चपला मारण्याचे काम आम्ही केले, असा चिमटा फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता काढला. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आनंदराव अडसूळ, योगेश सागर, मनीषाताई चौधरी, सुनील राणे, अमित साटम आदी उपस्थित होते.

Web Title: Devendra Fadnavis forgot the history that called independence hero Savarkar an apologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.