"देवेंद्र हे सुसंस्कृत, असत्याचा आधार घेऊन..," फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:42 PM2023-02-13T23:42:22+5:302023-02-13T23:43:01+5:30

२०१९ मध्ये अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता.

Devendra fadnavis is cultured commented on falsehood ncp leader Sharad Pawar s first reaction morning oath ceremoney ajit pawar | "देवेंद्र हे सुसंस्कृत, असत्याचा आधार घेऊन..," फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

"देवेंद्र हे सुसंस्कृत, असत्याचा आधार घेऊन..," फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext

२०१९ मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पहाटे सरकार स्थापन केले होते. हे सरकार फक्त काही तासच चालले होते, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “२०१९ मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती,” असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर आता राष्ट्रवागी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

“देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन ते अशा प्रकारची विधानं करतील असं वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

काय म्हणाले फडणवीस?
“२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.   

“माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या आणि निवडून आले. प्रचार सभेत पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा उद्धव ठाकरे टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: Devendra fadnavis is cultured commented on falsehood ncp leader Sharad Pawar s first reaction morning oath ceremoney ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.