पनवेल : देशभरातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुंतवणूक व रोजगाराच्या संधी सर्वात जास्त आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणा-या पोलीस दलांमुळेच महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.महाराष्टÑ राज्य पोलिसांचा ठसा जगभरात उमटला आहे. सतत तणावात वावरणाºया पोलिसांना क्रीडा स्पर्धेद्वारे विरंगुळा मिळतो. त्यांच्यामुळे सामान्य नागरिक सुरक्षित असल्याचे विचार मुख्यमंत्र्यांनी मांडले. ११ जानेवारीपर्यंत सुरू असणाºया या स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपºयातून पोलीस दलातील खेळाडू नवी मुंबईत दाखल झाले आहेत. यात २९२७ पुरुष, ९२९ महिला, तसेच २४३ प्रशिक्षकांचा सहभाग आहे.राज्य सरकार पोलीस दलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. लवकरच नवी मुंबईत पोलिसांकरिता क्रीडांगण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोला निर्देश देणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.पोलिसांनी धरला ठेका : या कार्यक्र मात पोलिसांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. आपल्या आवाजाने राज्यभर नावाजलेल्या जळगाव येथील पोलीस दलातील कर्मचारी संगपाल तायडे यांनी गाणे गाऊन उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडले. दिल्ली येथे २६ जानेवारी २०१७ रोजी सादर केलेला महाराष्ट्राचा चित्ररथ ठेवण्यात आला होता.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणा-या पोलिसांमुळेच महाराष्ट्र आघाडीवर - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:43 AM