"अजितदादा, तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं आमच्या कानात नक्की सांगा"; सुधीर मुनगंटीवारांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 01:41 PM2022-07-03T13:41:24+5:302022-07-03T13:41:54+5:30

सुधीरभाऊंच्या विधानानंतर अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांनाही हसू अनावर

Devendra Fadnavis Led Bjp Sudhir Mungantiwar funny advice to Sharad Pawar led NCP Ajit Pawar comedy video | "अजितदादा, तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं आमच्या कानात नक्की सांगा"; सुधीर मुनगंटीवारांची तुफान फटकेबाजी

"अजितदादा, तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं आमच्या कानात नक्की सांगा"; सुधीर मुनगंटीवारांची तुफान फटकेबाजी

Next

Bjp Sudhir Mungantiwar Ajit Pawar Funny Video: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेल्या राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने १६४ मते पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात मविआ आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ जणांनी मतदान केले. ३ जण मात्र मतदानादरम्यान तटस्थ राहिले. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत नार्वेकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना कोपरखळी मारली.

"अजितदादा, तुम्ही म्हणालात की सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या कानात सांगितलं असतं तर तुम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असती. ते आता शक्य नाही, त्यांची चूक झाली. पण मी तुम्हाला सांगतो की, तुम्हाला आयुष्यात असं जर कधी वाटलं तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा. तुम्ही या अगोदर सांगितलं होतं पण तेव्हा (२३ नोव्हेंबर) ते जमलं नाही. आणि जयंत पाटील यांच्या कानात कधीच सांगू नका. त्यांच्यात कानात सांगणं धोक्याचं आहे", अशी कोपरखळी मुनगंटीवार यांनी मारली.

अजित पवार नक्की काय म्हणाले होते?

"आता हे नवं सरकार कसं आलं काय आलं यात मी जात नाही. पण एकनाथराव तुम्ही मला जरी एकदा कानात सांगितलं असतं की उद्धव ठाकरेंशी बोला आणि अडीच वर्ष झालीत मला मुख्यमंत्री करा तर मी नक्कीच त्यांच्याशी बोललो असतो. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता", असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी विधानभवनात उपस्थित असेलल्या आदित्य ठाकरेंकडेही याची विचारणा केली. "काय आदित्य आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता ना?", असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वाक्याने सर्वत्र हशा पिकला.

Web Title: Devendra Fadnavis Led Bjp Sudhir Mungantiwar funny advice to Sharad Pawar led NCP Ajit Pawar comedy video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.