शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 5:43 PM

शरद पवार यांच्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आज भर पावसात सभा घेतली.

Devendra Fadnavis in Rain : महाराष्ट्रात निवडणुका आणि पावसाचं जुनं आहे. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागाल होता. त्या सभेची आजही राज्यात चर्चा असते. दरम्यान, आजचा(दि.15) दिवसदेखील पावसातील सभेमुळे चर्चेत राहणारा आहे. राज्यातील दोन दिग्गज नेत्यांनी आज भर पावसात सभा घेतल्या. 

"पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!" आज बत्तीस शिराळा इथं महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अचानक पाऊस सुरू झाला. या पावसातदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. "या ठिकाणी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुम्हाला सांगतो..आता सत्यजीत दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घोतोय ना? पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतेच. हे शुभ संकेत आहे," असं फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणतात, "काही नेत्यांचं म्हणणं आहे की, पावसात सभा झाली की निवडून येते. पण मी तुम्हाला सांगतो की, पाऊस पडो किंवा न पडो. पण मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सत्यजीत देशमुखांच्या रुपात आपल्याला सुसंस्कृत नेता आणि जमीनीवर काम करणारा नेता मिळाला आहे. वाकुर्डी बुद्रुकची योजना युती सरकारणे आणली होती. पण त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत योजना बंद पडली. त्याकाळी जयंत पाटील पालकमंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते, पण त्यांनी या प्रकल्पासाठी फुटकी कवडी दिली नाही. मी मुख्यमंत्री झालो आणि एका झटक्यात 100 कोटी रुपये या योजनेसाठी दिले," अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

शरद पवारांची पावसात सभाशरद पवारांची आज इचलकरंजी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेवेळी पाऊस सुरू झाला, पावसात शरद पवारांनी आपलं भाषण पूर्ण केलं. "महाराष्ट्रात मी सभेला बोलायला उभा राहिलो तर की पावसाची सुरुवात होते. त्यात मी बोलल्यानंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो. मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली, त्यांचा 5 वर्षाचा अनुभव बघितला तर सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सत्तेत बदल करायचा असेल महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करून सरकार बनवण्याचं ऐतिहासिक काम उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला घ्यायचे आहे," असं शरद पवार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली