मुंबई: आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत नीती (NITI) आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगोसबत बैठक झाली. आयोगाचे सीईओ आणि सर्वजण उपस्थित होते. बैठकीचे कारण म्हणजे, नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणे. बैठकीत राज्याकडून प्रेजेंटेशन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला तत्वतः संमती दाखवली आहे. अशाप्रकारची इंन्स्टिट्युट आम्ही तयार करू, लवकरच यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊ,' असं फडणवीस म्हणाले.
अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झालीफडवीस पुढे म्हणाले, 'राज्यात मॉनेटायझेशन ऑफ असेटचा विषय असेल, ब्लॉकचेन ऑफ अॅग्रीकल्चर असेल किंवा ट्रांसपोर्टेशन ईव्हीवर नेण्याचा विषय असेल, किंवा ड्रोनचा वापर करुन हेल्थकेअर आणि शेतीच्या क्षेत्रात परिवर्तन करण्याचा विषय असेल, अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली. यावर आयोगाचा प्रचंड अभ्यास आहे. विशेष म्हणजे, आयोगाने या संदर्भात एक टूल तयार केले आहे. आज सर्व विभागामध्ये डेटा तयार होतो, पण त्या विभागाचे कोरिलेशन होत नाही. पण, टूलमध्ये सर्व डेटा एकत्रित होऊन, याचा अभ्यास केला जाईल. त्या आधारे निर्णय घेता येतील, ही यंत्रणा राज्यात उभी करण्यावर चर्चा केली, अशीही माहिती त्यांनी दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईलयावेळी फडणवीसांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, 'संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी मदत केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच यासंदर्भात घोषणा केली आहे. आधी काही जीआर निघाले आहेत, यापुढेही निघतील.' यावेळी फडणवीसांनी एटीएसचेही कौतुक केले. ते म्हणाले, 'महाराष्ट्र ATSने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. 15 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांच्या प्रमुखाला नालासोपारामधून पकडून झारखंड पोलिसांच्या हवाली केले आहे.'