जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 05:11 PM2023-01-26T17:11:24+5:302023-01-26T17:12:01+5:30

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Devendra Fadnavis refrained from talking about Jayant Patal's secret blast | जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले...

जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले...

googlenewsNext

चंद्रपूर - पहाटेचा शपथविधी ही खेळी असू शकते. त्यामुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाली असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलणं टाळलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला असता २६ जानेवारी असल्याने आज राजकीय काहीही बोलणार नाही असं सांगत जयंत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे टाळले. सुमारे ३ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनातील शपथविधी सोहळ्याने राजकीय भूकंप झाला होता. 

काय म्हणाले जयंत पाटील?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी तीन वर्षांपूर्वी राजभवनात झाला होता. शरद पवारांचीही ती खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहाटेचा शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली असं जयंत पाटील म्हणाले.

काहीही अर्थ नाही - चंद्रकांत पाटील 
जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटाला काही अर्थ नाही. तो गौप्यस्फोट त्यावेळी का केले नाहीत. मूळात उशिरा सूचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. कुणी काय म्हणाले याला काही अर्थ नाही असं सांगत भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. 
 

Web Title: Devendra Fadnavis refrained from talking about Jayant Patal's secret blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.