शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

बॅगेत पैसे भरले अन् माझ्या बंगल्यावरील...; देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 3:45 PM

माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय. तुम्ही त्यांना सोडवण्यास मदत करा असं त्या मुलीने अमृताला सांगितले अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी छापल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. अमृता फडणवीस यांना पैशांची ऑफर करणारी ही युवती कोण अशी चर्चा सुरू झाली. त्यात अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. 

या मुद्द्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सभागृहात विचारल्याबद्दल अजितदादांचे आभार मानले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, अनिल जयसंघानी नावाचा व्यक्ती जो गेल्या ७-८ वर्षापासून फरार आहे त्याच्यावर १४-१५ गुन्हे आहेत. त्याच्या मुलीने अत्यंत हुशारीने गेल्या दीड वर्षापासून माझ्या पत्नीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. अनिल जयसिंघानी यांची मुलगी ती शिकलेली आहे. हुशार आहे. ती २०१५-१६ दरम्यान अमृता यांना भेटत होती. त्यानंतर तिचे येणे बंद झाले. त्यानंतर अचानक २०२१ मध्ये या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणे सुरू केले. मी डिझाईनर आहे. कपडे, ज्वेलरी तयार करते. बेस्ट ५० पॉवरफूल व्ह्यूममध्ये तिचं नाव आले, अमृताच्या हस्ते तिने पुस्तक प्रदर्शन केले अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने अमृताचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले. 

त्यानंतर एकदा तिने अमृताला सांगितले की, माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय. तुम्ही त्यांना सोडवण्यास मदत करा. माझ्या पत्नीने तुम्ही निवेदन द्या. त्यावर चौकशी होईल असं म्हटलं. माझे वडील सर्व बुकीजला ओळखतात. आम्ही बुकीजची माहिती द्यायचो आणि दोन्ही बाजूने पैसे घ्यायचो. आपण असं करू असं तिने अमृताला सांगितले. पण अमृताने त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या वडिलांना सोडवा मग मी १ कोटी देईन अशी ऑफर तिने केली. त्यानंतर वारंवार बुकीजचा विषय निघाला तेव्हा माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केले. हा प्रकार जेव्हा मला कळाला तेव्हा आधी FIR नोंदवला.  त्यानंतर काही दिवसांनी एका Unknown नंबरवरून काही व्हिडिओ क्लिप्स आल्या. त्या उघडून पाहिल्या त्यात एक गंभीर व्हिडिओ म्हणजे ती मुलगी बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरतेय. तशीच दुसरी बॅग भरून आमच्या बंगल्यावर कामावर असलेल्या महिलेला देतेय. या सर्व गोष्टीची फॉरेन्सिककडून तपासणी झाली आहे. दोन्ही बॅगेचा व्हिडिओ आणि एका पैसे तर दुसऱ्यात कपडे होते. तिने अडकवण्यासाठी ट्रॅप रचला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

१ कोटींची लाच, अमृता फडणवीसांचा आरोप, अजित पवारांचा प्रश्न अन् देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

पोलिसांनी रचला सापळाFIR दाखल केल्यानंतर त्याची गुप्तता पाळण्यात आली. या प्रकरणात पोलिसांकडून एक सापळा रचण्यात आला. त्यात महिला सापडली. तिने काही पोलीस अधिकारी, नेत्यांची नावे तिने घेतली. मागच्या सीपींच्या काळात माझ्या वडिलांवरील केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती. तुम्ही आल्यावर ती थांबली. बोलता बोलता तिने हे कुणी करायला सांगितले होते हे सांगितले. यातील बऱ्याच गोष्टी रेकॉर्ड स्वरुपात आहेत. जवळपास तो व्यक्ती ट्रॅपमध्ये येणार होता. पण तितक्याची ही बातमी लीक झाली. माझा कुणावरही आरोप नाही. पण ज्याप्रकारे तिने हिंट दिल्या. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय हे मी मागेही सांगितले. तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करायचा प्रयत्न सुरू आहे असं मला सांगण्यात आले होते असंही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात म्हटलं.  

या प्रकरणाची योग्य चौकशी होईलया महिलेच्या मागे जी व्यक्ती आहे तो हाती आला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या. हा विषय अजितदादा तुम्ही उपस्थित केला त्याबद्दल मी आभारी आहे. या प्रकारामुळे राजकारणात कुठल्या पातळीवर आपण चाललोय? जवळजवळ दीड वर्ष ती घरी येत होती. कॅमेऱ्यात सर्व शूट करायची. फोन रेकॉर्ड करायची. यामागे राजकीय कट आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. पण या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल अशी माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली. 

पाहा व्हिडिओ -

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारAmruta Fadnavisअमृता फडणवीस