शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती
2
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
3
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
4
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
5
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
6
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
7
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
8
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
9
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
10
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
11
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
12
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
13
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
14
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
15
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
16
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
17
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
18
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
19
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
20
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध

फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 7:05 AM

खोट्या बातम्या पसरविण्याची सुपारी; संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धवसेना यांच्यात जागावाटपावरून ताणाताणी सुरू असताना सोमवारी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित गुप्त भेट घेतल्याच्या चर्चेने एकच गदारोळ निर्माण झाला. एका वृत्तवाहिनीने या भेटीची बातमी दिली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे अचानक यू-टर्न घेणार का, अशा चर्चा रंगू लागल्या. विशेष म्हणजे काँग्रेसमधील सूत्रांचा हवाला या बातम्यांत देण्यात आला होता. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उद्धवसेनेचे खा. संजय राऊत या तिघांनीही या बातम्या पूर्णपणे निराधार आणि खोट्या असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.

महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी देखील जागावाटपात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातही वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या.

भाजप जाणीवपूर्वक गैरसमज पसरवतेय

उद्धवसेना आघाडीतून बाहेर पडणार, या बातम्यांत काहीही तथ्य नाही. भाजप जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवत आहे. पराभवाच्या भीतीने अशी खेळी करीत आहेत. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

एक टक्काही तथ्य नाही

या बातमीत एक टक्काही तथ्य नाही. काँग्रेस आणि उद्धवसेनेत वाद निर्माण व्हावा हे काही लोकांचे षडयंत्र आहे. त्यामुळे ही बातमी मुद्दाम पेरली गेली आहे. महाविकास आघाडी ही एकसंधच राहील.- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

खोट्या बातम्या पसरविण्याची सुपारी

खोट्या बातम्या पसरविण्याची सुपारी कोणी दिली, याची माहिती आमच्याकडे आहे. असे कोणी दावे करणार असेल तर त्यांनी आधी बाप दाखवावा, नाहीतर श्राद्ध करावे.- खा. संजय राऊत, नेते, उद्धवसेना

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊत