पुणे: संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी दरड कोसळून तर काही ठिकाणी पुरामळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिस्थितीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'राज्यात अनेक ठिाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्यामुळे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. त्या भागातील लसीकरणावर जोर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आरोग्य युनिटही तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
फडणवीसांना घेऊन केंद्राकडे जाणारटोपे पुढे म्हणाले की, राज्याला दर चार-पाच दिवसांनी दहा लाख कोरोना लस मिळत आहेत. पण, दहा लाख डोस दररोज मिळायला हवेत. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत. आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लसींची मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेऊन केंद्रात जाणार आहोत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
राज्याला पावसानं झोडपलंसंपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाकडील माहितीनुसार, शुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.