पुणे : अनावश्यक वापर होत असलेल्या १ हजार मेगावॅट विजेची बचत करण्याचे धोरण राज्य शासनाकडून आखण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यासाठी एलईडी बल्ब व कार्यक्षम ऊर्जा उपकरणांच्या वापरावर शासनाकडून भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.पुण्यातील राजभवनामध्ये सौरऊर्जेपासून १५ लाख युनिट वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, शासनाने वीजनिर्मितीबरोबरच वीज बचतीचेही धोरण आखले आहे. त्याद्वारे एक हजार मेगावॅट वीज बचत केली जाऊ शकते. राज्यात आठ कोटी एलईडी बल्ब लावले आहेत. शेतीचे फिडर सौरऊर्जेवर रूपांतरित करणार आहोत. त्यामुळे विजेपोटी द्याव्या लागणाºया अनुदानात बचत होईल.विद्यासागर राव म्हणाले, केंद्र सरकारने सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सोलर मिशनच्या अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावॅटवरून एक लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करायला हवा.
एक हजार मेगावॅट वीज वाचवणार - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:57 AM