महाराष्ट्रातदेवेंद्र फडणवीस पुन्ह एकदा मुख्यमंत्री होत आहेत. भाजपं विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्यान नावावर शिक्कामोर्तब झाले. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची नेता म्हणून निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला. याला सर्व नेत्यांनी एका स्वरात अनुमोदन दिले. यानंतर सर्व नेत्यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले.
देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात एक विशेष आणि शक्तिशाली नेता बनवते. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. एवढेच नाही तर ते फडणवीसांच्या नेतृत्व क्षमतेचे आणि मेहनतीचे कौतुकही करत असतात. यातच, दोन घटना अशाही आहेत, ज्यांमुळे देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे मन जिंकले आणि मोदींचा देवेंद्र फडणवीसांवरील विश्वासही अधिक वाढला. याच्या फलश्रृती स्वरुपात 2014 मध्ये फडणवीसांना मुख्यमंत्रीही बनवण्यात आले होते. तेव्हा फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते.
फडणवीस म्हणाले होते, 40 जागा जिंकू शकतो आल्या 41 -यातील पहिली घटना आहे ती 2014 च्या लोकसाभा निवडणुकीदरम्यानची. तेव्हा, महाराष्ट्रातील शेवटची प्रचार सभा अटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतत असताना काही नेते त्यांना सोडण्यासाठी विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी काही नेत्यांना, आपल्याला राज्यात किती जागा मिळू शकतात? असा प्रश्न केला होता. यावर, अनेक नेत्यांनी 15 से 20 जागा असे उत्तर दिले होते. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारले. यावर फडणवीस म्हणाले होते, 40 जागा जिंकू शकतो. मात्र जेव्हा प्रत्यक्षात आकडे आले तेव्हा हा आकडा 41 होता. तेव्हा भाजपला 23 तर अखंड शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या.
दुसरा किस्सा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा -यानंतरचा दुसरा किस्सा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा. लोकसभेला भाजपने अधिक जागा जिंकल्याने विधानसभा निवडणुकीसाठीही अधिक जागा मिळाव्यात, अशी भाजपची इच्छा होती. मात्र तत्काली शिवसेनेचा याला विरोध होता. यावर दीर्घ चर्चा चालली अखेर दोन्ही पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे ठरवले. यानंतर, भाजपने 260 जागांवर आपले उमेदवार उतरवले आणि 122 जागा जिंकल्या होत्या.तेव्हा तत्कालीन शिवसेना अधिक जागांवर अडून बसली होती. यावर, पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी स्वतंत्रपणे लढण्यासही काही हरकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. यावर भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले आणि निकाल भाजपच्या बाजूनेच आला. या दोन्ही प्रसंगांमुळे नरेंद्र मोदी यांचा फडणवीसांवरचा विश्वास अधिकच वाढला आणि शेवटी 2014 मध्ये फडणवीसांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.