शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

देवेंद्र फडणवीसांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांवर लवकरच चित्रपट; अवधूत गुप्तेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:14 AM

'जनकल्याणासाठी झटला हा नेता' हे महाजनांवरील गीत त्यांनी सादर केले.

जामनेर - झेंडा चित्रपटात कार्यकर्त्यांची व्यथा मांडली होती, ग्रामविकास, क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचा एकमेव झेंडा घेतल्याने ते सलग ६ टर्म निवडून आले. सध्याच्या राजकारणात हे शक्य नाही, त्यांच्यावर चित्रपट काढावा असे वाटते, असे गायक आणि चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी येथे बुधवारी रात्री झालेल्या स्वरसंध्या कार्यक्रमात सांगितले.

दिवाळी पाडवा व भाऊबीजेचे औचित्य साधून गिरीश महाजन फाउंडेशनच्या वतीने स्वरसंध्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्षा साधना महाजन अँड. शिवाजी सोनार व छगन झाल्टे यांनी कलावतांचे स्वागत केले.'जनकल्याणासाठी झटला हा नेता' हे महाजनांवरील गीत त्यांनी सादर केले. गुप्ते यांनी महाजनांशी संवाद साधताना थेट विचारले, राज्यातील सत्तांतरामागे जे घडले त्या मागे तुमचा हात होता, असे मुंबईत बोलले जाते. यावर महाजन यांनी सांगितले की, यात माझा खारीचा वाटा होता. माझ्या कामामुळे ट्रबल शूटर म्हणविला गेलो. जामनेरला राज्यातील नंबर एकचे शहर होते. करायचे आहे. अंबानी म्हटले २५ कोटी न्या; पण चांगले क्रीडा संकुल करा. येत्या वर्षभरात सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुलाची उभारणी होईल, असे महाजन यांनी सांगितले.

एकच झेंडा हिंदुत्वाचा, भाजपचा प्रवासाची सुरुवात शालेय जीवनापासून झाली, रा.स्व. संघ, अभाविप ते भाजप असा प्रवास, पहिल्या निवडणुकीत राजांसमोर लढणे कठीण होते, मात्र जिंकलो, एकदा नव्हे दोनदा नाही तर सलग ६ वेळा जिंकलो, मतदारांनी प्रेम दिले, जि. प. निवडणुकीत साधना महाजन निवडून आल्या. शेव-मुरमुरे खाऊन कार्यकर्त्यांनी प्रचार केला, आता मात्र प्रचाराची व कार्यकर्त्यांचीही परिस्थिती बदलली आहे. एकच झेंडा हिंदुत्वाचा, भाजपचा हाती घेतल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास आमदार, अधिकारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस