मुंबई : भाजपच्या आमदारांची नवीन विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी बुधवारी सकाळी बैठक होणार असून, तीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. फडणवीस ५ डिसेंबरला आझाद मैदानावर नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि शिंदे व अजित पवार मंनिपटान्नी शपथ घेतील असे चित्र मंगळवारी जवळपास स्पष्ट झाले आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदासोबतच बुधवारी भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोदही निवडले जाणार आहेत. आमदारांच्या बैठकीपूर्वी दोन्ही निरीक्षक भाजप प्रदेश कोअर कमिटीशी चर्चा करणार आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे आजारी असल्याने सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येऊ शकला नव्हता. मात्र, शिंदे यांच्या वतीने उदय सामंत यांनी मंगळवारी दुपारी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. आझाद त तयारीचा आढावा तिन्ही त्यांनी घेतला.
फडणवीस-शिंदे चर्चा
देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. दोन नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेबाबत अर्धा तास बंदद्वार चर्चा झाली. मंत्रिपदे व खातेवाटपासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
किती मंत्री घेणार शपथ ?
आझाद मैदानावर नेमके किती मंत्री शपथ घेणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तिन्ही पक्षांचे मिळून किमान २० मंत्री शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्रीच शपथ घेतील, असे म्हटले जात होते; पण शपथविधीचा जाहीर समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असताना २० हून अधिक मंत्री शपथ घेतील, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ माजी मंत्र्यांनी केला.
■ सर्व समाजघटकांतील नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा तसेच विभागीय संतुलन साधल्याचा संदेश द्यायचा असेल तर मंत्र्यांची संख्या २० पेक्षा अधिकच असावी लागेल, असा तर्क या नेत्याने दिला. मंत्रिपदाचे संभाव्य वाटप भाजप शिंदेसेना : २१ ते २२ : १२ ते १३ अ. पवार गट: ८ ते ९ सीतारामन, रूपानी पोहोचले : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे नेतानिवडीच्या बैठकीसाठीचे निरीक्षक असतील. हे दोघेही रात्री मुंबईत पोहोचले आहेत.त्यांनी भाजपच्या निवडक नेत्यांशी चर्चा केली.
नेता निवडीनंतर लगेच राज्यपालांची भेट
भाजपच्या आमदारांची नेता निवडीसाठीची बैठक बुधवारी • सकाळी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होईल. त्यानंतर महायुतीचे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बुधवारी राजभवनवर राज्यपालांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील.राज्यपाल त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील.
५ डिसेंबरला शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल आणि विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाईल व ती राज्यपालांना कळविली जाईल. राज्यपालांच्या मान्यतेने अधिवेशनाची तारीख ठरेल. ७ ते ९ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु होईल.
सामंत-फडणवीस तासभर चर्चा
शिंदेसेनेचे नेते आ. उदय सामंत यांनी दुपारी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केली. भाजप-शिंदेसेनेत समन्वयाची भूमिका करणारे आशिष कुलकर्णीही यावेळी हजर होते. आपल्या पक्षाची कोणत्या आणि किती खात्यांची मागणी आहे याबाबत सामंत यांनी फडणवीस यांना सांगितले. किमान १५ मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते.
मोदी, शाह, नड्डा येणार
शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे भाजप व मित्रपक्षांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील.